मागे वळून पाहताना
[ भाग ३: शिक्षण ]
चौथीपर्यंत शिक्षण प्रक्ट्सिंग स्कूल मधी झाल. हुजूरपागा शाळेत मी काही वर्ष होते. मी पाचवीला गेले. आणि मला टाइफोइड झाला तो उलटला , त्या मुले माझी शाळा जवळजवळ सहा महिने बंद होती. पुन्हा मला पाचवीतच बसव लागल. आणि मला या हायस्कूल जीवनात ज्या बाई मिळाल्या त्या मणजे मालिनीबाई पानंदीकर - सुलभा पानंदीकरची बहिण. त्या माझ्या वर्गशिक्षिका होत्या. अतिशय प्रेमळ होत्या त्या. याच काळात मालिनीबाईनि लग्न केला आणि त्या मालिनीबाई खान-पानंदीकर झाल्या. हा विवाह त्या काळी खूप गाजला. पण त्याचा परिणाम आमच्यावर असा झाल कि तो विवाह प्रकार आई काळ्यावर आईने आम्हाला शाळेतून काढले. त्याच वेळी अण्णासाहेब कर्वे यांची कन्या शाळा नुकतीच चालू झाली होती. त्या वेळी मुख्याध्यापक गो.म.चिपळूणकर होते. ते आमच्या आई वडिलांकडे आले असावेत. ते म्हणले असावेत "तुमच्या सारख्या मुली आमच्या शाळेत आल्या तर आमच्या शाळेचा पटवाढीसाठी त्याचा उपयोग होईल. मुली वाढतील. मग आईने सातवीत मला कन्या शाळेत घातलं. दहावीपर्यंत मी कन्या शाळेत होते.
मी
दहावीत असतानाच माझ लग्न झाल. आम्हाला दहावीला बाळूताई खरे- म्हणजे
मालतीबाई बेडेकर शिकवायला होत्या. फारच छान शिकवायच्या. त्या आम्हाला मराठी
शिकवायच्या, संस्कृत शिकवायच्या. आम्हाला कन्या शाळेतले शिक्षकसुद्धा
अतिशय चांगले मिळाले. हे माहेरचे संस्कार घेवून मी बावडेकर घराण्यात आले.
त्यावेळी मला सासू-सासरे कुणीच न्हवते. त्यामुळ घराची सारी जबाबदारी ओघान
माझ्यावर पडली. मात्र माझ्या बऱ्याचश्या आवडीनिवडी ह्यांना माहिती
असल्यामुळे त्यांनी त्या जपायचा प्रयत्न केला.
[ Read : Special Note for this article. ]
0 comments:
Post a Comment