Wednesday, May 1, 2013

मागे वळून पाहताना भाग ४ : आवडी-निवडी

मागे वळून पाहताना 
[ भाग ४ : आवडी-निवडी ]

आमच राहाण बावड्याला - म्हणजे गगन बावड्याला - पण आम्ही खुद्द बावड्याला राहत नव्हतो. बावड्यापासून पाच-सात मैलावर पळसंबे नावाचे गाव होते. तिथे आम्ही राहत होतो. पण तिथं - कस राहत होतो - पूर्वी त्या जागेत हिरडा डेपो होता. त्याची इमारत. तिथे झोपड्यातून राहत होतो. दोन खोल्या होत्या फक्त. आमचा वाडा बावड्याला होता. पण तिथे हे राहिले नाहीत. पण असं असूनही वाचनाची आमची आवड खूपच वाढली. वाचनाशिवाय दुसर करमणुकीच साधनच न्हवत. मला वाचनाची आवड होती, टेनिस खेळण्याची आवड होती. त्यामुळे टेनिस कोर्ट तिथं केल होत. माझ्याबरोबर तो टेनिस खेळायचा, कॅरम खेळायचा. वाचन होत. फिरायला जायला मला खूप आवडायचं. फिरायला जायची. त्यांना संगीताची आवड असल्यामुळे कुठलीही नवी रेकोर्ड निघाली की, ती आमच्या घरी यायची. त्या वेळी पुण्या-मुंबईला गेलो की, पुस्तकाच्या दुकानात हमखास एखादी चक्कर व्हायची. तिथे पुस्तकांची खरेदी व्हायची. इथे महाराष्ट ग्रंथ भांडाराचे कुलकर्णी नवी पुस्तके आली की पाठवायचे. मग त्यातली आवडणारी पुस्तके आम्ही ठेवून घेत असू. अशारितीने आमची लायब्ररी संपन्न झाली. त्यामुळ बावड्याला मी कधी एकटी आहे असं मला कधी वाटलाच नाही. ही पुस्तकं माझी सोबत करत होती.
लहानपणापासून मला मुलांची आवड. त्यामुळच आपणही मुलांच्या शिक्षणाकड वळाव असं मला वाटायला लागलं. कुठलही लहान मूल दिसलं कि त्याच्याशी खेळावं, गप्पा-गोष्टी कराव्यात असं वाटायचं. 

[ Read : Special Note for this article. ]

0 comments:

Post a Comment