मागे वळून पाहताना
[ भाग २: कुरुन्द्वाडकर घराणे ]
माझ सार शिक्षण पुण्यातच झाल. माझे आई-वडील ग्रँज्युएट नव्हते. आई तर नव्हतीच नव्हती. कारण मुलीला शिक्षण देणे हे त्या काळात नव्हत . मात्र कुरुन्द्वाडकर घराण्यातली मंडळी जरा पुरोगामी विचाराची होती. मुलींना शिक्षण द्यायला हवं या विचाराची म्हणूया. मात्र या शिक्षणात पुस्तकी शिक्षणापेक्षा व्यावारिक शिक्षण देण्यावरच भर होता. माझ्या आईला लिहायला वाचायायला शिकवलं होत. इतकाच नाही तर माझी आई घोड्यावर बसायची. आमच्या चुलत आजोबाना घोड्यांचा खूप नाद होता. त्यावेळी घरी घोडेगिरी असायची. वडिलपण घोड्यावर चांगले बसत. माझी आईच नवे तर तिची आई मणजे माझी आजी पण चांगली वाचत असे. त्यानासुदा वाचकाचा खूप नाद होता. केवाल धार्मिक ग्रंथाच नाही तर सर्व प्रकारचे वन्दमय वाचत असत. धार्मिक ग्रथ बरोबर आता पर्यंतची कितीतरी पुस्तके त्यांनी वाचली होती.
आमच्या गह्रात माझ्यासह चार भावंड. नंतर आईने आपल्या दोन बहिणी- एक माझ्या वयाची होती आणि एक माझ्या पेक्षा थोडी मोठी. त्या दोघींना त्या वेळी कुरुन्द्वाडला शिक्षनाची सोय नवती म्हणून आईने त्यांना पुण्याला आणल. आणखी एक दोन मुल अमच्याच नातात्य्तील होती. अशी सात आठ मुल आमच्या घरात होतो. आणि आई सर्वाना सारख वागवायच. तिन कुणाला गरीब श्रीमंत अस वागवल नाही. हा मुलगा ती बहिण अस मुळीच तिच्या जवळ नव्हत. त्या वेळी सगळ्या मुलांना समान शिक्षण मिळायचं आणि माझ्या आईचा असा दृष्टीकोन होता कि जे मला नाही मिळाल ते माझ्या मुलांना मिळाल पाहिजे, त्यांना शिक्षणात कोणीतीही कमतरता पडू नये. म्हणून त्यांनी आम्हाला शालेय शिक्षन तर दिलाच. त्याच बरोबर संगीतच शिक्षण दिल. पुण्यातील प्रसिद्ध अष्टेकर बुवांना संगीत शिकवायला ठेवाल होत. आणि आम्ही मुल रोज एक तास त्याचं कड संगीत शिकत होतो. व्यायामाच्या बाबतीत तसाच होत. दातार नावाचे एक तालीम मास्तर होते.ते आमचा सराव करीत. सगल्या तारेच शिक्षण आईने आम्हाला दिल. शिक्षणात कसलाच भेदभाव केला नाही.
वडील तसे खेळणारे होते.ते कोल्हापूरात राहिलेले. त्या मुले त्यांना टेनिस खेळायला आवडायचे . त्या मुळे ते खेळाच्या बाबतीत जागरूक असत. लहानपणीच त्यांनी आम्हाला टेनिस खेळायला शिकवलं. आमच्या कडे त्या वेळी घोडी होती. घोड्यावर बसायला रायडींग करायला त्यांनी शिकवलं. आमच्या घराच्या आवरत वडिलांनी पोहण्यासाठी खास सोय करून ठेवली होती.
वडिलांना वाचनाचा नाद होता. पण आईला जर जास्तच. माझी वाचनाची आवड वाढण्याच सर श्रेय आईलाच. लहानपणी वाचलेली कितीतरी पुस्तक मला आठवतात. त्या वेळी खांडेकर मला खूप आवडायचे. फडके आवडायचे. त्यांची भाशाश्यैली खुओअच आवडायची. हरी नारायण आपटे यांच्या सगळ्या कादंबर्या मी वाचल्या होत्या. मी सोळा वर्षांची होते त्या वेळी मी जवळजवळ सगळे लेखक वाचले होते. आईच्या वाचनाच्या आवडी मुळे आमची पुण्याची लायब्ररी सामुर्ध झली होती. त्या काळात नवीन पुस्तक आली कि आमच्या घरी असायची. वर्तमान पत्रे येत असत. पुस्तक हाताळायला आईने परवानगी दिली होती.
आई वडिलांच्या चान्गल्या ,सुन्स्कृत लोन्काशी ओळखी होत्या. त्या मुळ चांगल्या पुस्तकांची देवन घेवाण होत असे. आम्हाला आई वडिलांनी हे संस्कार तर दिलेच. आणि शाळा तर आमच्या वाड्याच्या जवळच होती. प्रक्ट्सिंग स्कूल हे त्या शाळेच नाव ती सरकारी होती आणि तिथले शिक्षक पन चांगले होते. अतिशय चांगल्या तर्हेने आमच्याशी वागायचे. त्या मुले आजही मला पहिली पासूनच्या सर्व शिक्षकांची नवे आठवतात. त्या वेळी प्रत्येक वर्गाला एकाच शिक्षक असे. पण सगळे विषय ते तितक्याच तन्मयतेने शिकवायचे. शिवाय घरी शिकवणी होतीच. मी साडे चार पावणे पाच वर्षाची होते. त्या वेळी आम्हाला मराठी शिकवायला मास्तर ठेवले होते. त्या मुळे झाल काय मला एकदम पहिले मध्ये घातल. त्यामुळ मी शाळेत अभ्यासाच्या बाबतीत मी कधीही मागे राहिले नाही.
[ Read : Special Note for this article. ]
0 comments:
Post a Comment