Tuesday, December 4, 2012

मागे वळून पाहताना भाग १: बालपण

मागे वळून पाहताना ...

[भाग १: बालपण ]

माझा जन्म ४ डिसेंबर १९१५ ला माझ्या आजोळी म्हणजे कुरुन्द्वाडला झाला. कुरुन्द्वाडकर संस्थान जे जुनिअर घारण होत , त्या घराण्यातल्या माझ्या आई . साहजिकच मुळीच पाहिलं बाळंतपण माहेरी म्हणून तिकडे कुरुन्द्वाडला झाल. 

माझ सार बालपण पुण्यातच गेल. आई - वडील पुण्यातच राहत होते. सरदार रास्त्यांच आमच घराण. पुण्यातल्या पहिल्या दर्जाच्या सरदारांमध्ये आमच्या रास्त्यांची गणना होत होती. आमच्या रास्ते घराण्यात आई - वडिलांशिवाय तस कुणीच नव्हत. काका नाहीत . काकी नाहीत. कुण्णी कुण्णी नव्हत. एक आत्या होत्या. पण माझ्या जन्मापूर्वीच कधीतरी आधी गेल्या होत्या. एक आतेभाऊ . त्याच्या पलीकडे मला इकडच्या घराण्यातलं कुणी नव्हत. मात्र इकड कुरुन्द्वाडकर घराण्यात म्हणजे आजोळी माझ कौतुक करणारी खूप मानस होती. रास्ते घराण्यातली मी पहिली मुलगी म्हणून त्या काळात माझ खूप कौतुक !

माझे आजोबा-आजी  म्हणजे वडिलांचे आई-वडील फार लवकर गेले होते. माझे आजोबा रास्ते घराण्यात दत्तक आलेले. त्यांच्या आई उमाबाई यांनीच माझ्या वडिलांचं संगोपन केल. या उमाबाईसाहेबाना मी पहिल्याचही मला आठवत. मी पाच वर्षाची होते. त्यावेळी त्या गेल्या. पण कुणी तरी सांगितलेली त्यांच्याविषयची एक आठवण मला आत्ता आठवली. ज्यावेळी माझा जन्म झाला त्यावेळी मुलगी झाली म्हणून फारसा आनंद कुणाला झालेला नव्हता. परंतु माझ्या या पानाजीबाई तिथ आल्या होत्या. त्यांनी सांगितलं कि, "मला पणती  झाली - मुलगी झाली म्हणून तुम्ही आनंद का व्यक्त करत नाही ? अस काही नाही. वाजंत्री वाजवायलाच हवी. आणि कुरुन्द्वाडला मोठ्या थाटान त्यांनी बारस केल. "

त्यावेळी माझ नाव ठेवलं होत मैना. माझ्या आजीच नाव होत मैना. तेच नाव मला ठेवलं होत. पण माझी एक चुलत मावशी होती. त्या मावशीच आणि माझ्या आईच अतिशय सख्य होत. त्यांना एक मुलगी झाली होती. तीच नाव माई होत आणि त्यावरूनच माझ नाव माई हेच ठेवलं गेल. मैना हे नाव कागदोपत्रीच राहिलं . कुणाला ते फारस माहीतही नाही. आणि अश्या रितीन मी मैना रास्ते ची माई रास्ते झाले. आणि शाळेमध्ये माई या नावानेच मी ओळखली जाऊ लागले. 


[ Read : Special Note for this article. ]