[ Update: For full list of published articles in this category, Click Here ]
--
Editorial Team
Maisaheb Bavdekar Alumni Portal
" आज ४ डिसेंबर , याच दिवशी १९१५ मध्ये कुरुंदवाड सारख्या लहान गावात
माईसाहेब यांचा जन्म झाला होता. त्यावेळी कुणाला थोडीशीही कल्पना नसेल कि
ही व्यक्ती पुढे इतके मोठे काम करेल. आपल्या सगळ्यांना नेहमीच उत्सुकता
होती कि माईसाहेब यांचे जीवन कसे होते? कोणत्या घटनांनी त्यांच्या जीवनाला
कलाटणी दिली? एका श्रीमंत संस्थानात जन्म घेवूनही त्यानी हा वेगळा ध्यास का
घेतला होता? हा ज्ञानाचा कल्पतरु कसा जोपासला आणि फुलवला?
अशा कितीतरी
प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आम्ही आजच्या या खास
दिवशी नवीन लेखमाला सुरवात करत आहे
" मागे वळून पाहताना..."
या लेखमालेचे
खास वैशिष्ठ म्हणजे यामधील लेख हे प्रत्यक्षात माईसाहेब यांची मनोगते
आहेत. बऱ्याच वर्षांपूर्वी असा प्रयत्न माईसाहेब यांच्या हितचिंतकांनी ,
नातेवाईकांनी आणि सोबत्यांनी केला होता. त्यांनी " मागे वळून पाहताना..."
नावाची एक १२ पानी पुस्तिका प्रकाशित केली होती. भरपूर काळ संग्रहात
राहिलेल्या त्या पुस्तिकेतील लेख आम्ही या निम्मिताने पुन्हा आपल्यासमोर
सादर करत आहे.
वाचकांनी याची नोंद घ्यावी कि हे लेख खूप वर्षांपूर्वी
प्रकाशित झाले आहेत. आम्ही हे लेख केवळ माहितीसाठी पुन्हा प्रकाशित करीत
आहोत. संपूर्ण माहितीसाठी "Special Note" पहा . "
--
Editorial Team
Maisaheb Bavdekar Alumni Portal