प्रथम पासूनच कोल्हापूरची ओढ होती. त्यामुळेच मी माझे कॉलेज शिक्षण
कोल्हापुरात पूर्ण केले. कोल्हापूर नगरवासीयांच्या अतूट प्रेमामुळे सतत याच
शहरात राहावे, नोकरी मिळावी हि माझी प्रथमपासूनच धडपड होती. अशावेळी एक
अनोळखी व्यक्ती कडून मा. माईसाहेब यांच्या शाळेत आपल्याला नोकरी मिळू शकेल
असे समझले. या परिसरातून वारंवार ये-जा करत होतो. परंतु शाळेमध्ये कधीही
येण्याचा प्रसंग आला नव्हता. तसा मी या शाळेला नवखाच होतो.
प्रथमच शाळेत येताना माईसाहेब यांच्या समोर जावे लागले. त्यावेळी मनात भीती निर्माण झाली होती. प्रचंड नावलौकिक आणि कडक शिस्त असलेल्या या शाळेत आपल्याला नोकरी मिळेल का नाही? असे सतत वाटत होते. असे असताना माईसाहेब यांनी मला नोकरी दिली हि किती भाग्याची गोष्ट आहे.
प्रथम शाळेत काम करायला सुरवात केली होती. अजूनही विद्यार्थी दशा पूर्णतः संपलेली नव्हती. अशातच या वातावरणाशी समरस होताना संकटे येत होती. काही चुकाही होत होत्या. परंतु प्रत्येक वेळी माईसाहेब यांनी मुलाप्रमाणे मला आधार दिला. या शाळेतील माझ्या इतर सहकार्यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन अमूल्य आहे. या शाळेतील मुख्य घटक म्हणजे 'विद्यार्थी'. सुरवातीस मी नवीन असताना मुलांची ओळखही नव्हती. परंतु मुलांमध्ये शिक्षणाबद्दलचा असलेला आदर , शाळेची शिस्त, काही विशिष्ट नियम यामुळे या ठिकाणी काम करताना सार्थक वाटले.
Author
Jadhav D. J.
( 1997 )
[ Original Article from "सुवर्ण पंख" . Read Note for more information ]