ज्या वेळी आपण शाळेत होतो त्यावेळी आपला सगळ्यात आवडता आवाज म्हणजे ५
वाजताची घंटा. ती वाजली रे वाजली कि पूर्ण परिसराचे रूपाच बदलून जायचे.
कंटाळा एकदम गायबच ! मग काही जन वर्गात दप्तर भरत , कोणी पाणी प्यायला जात,
कोणाला सायकल काढायची घाई, तर कुणाला रिक्षात बसायची. या सगळ्यात रिक्षाचा
होर्न आणि रिक्षा मामांची आरडा ओरड हि सुखावह वाटे. रिक्षा मामा आणि मुले
यांचे वेगळेच नाते झालेले होते. अजूनही कधी ते मामा आपल्याला दिसले तरी आपण
स्मित करून आपले जुने दिवस आठवतो. रोज न चुकता मुलांना घरून घेवून जाने
आणि संध्याकाळी सुरक्षित पुन्हा आणून सोडणे हि महत्वाची कामगिरी हे मामा
पार पडतात. अशांना विसरून कस चालेल. खाली रिक्षा मामांच्या नावाची यादी
दिली आहे. पहा आठवतात का तुमचे मामा !!
- विलास माने
- सुरेश पाटील
- श्रीपती मोरे
- सुर्यकुमार कोतमिरे
- विजय धुमाळे
- आर. एल. शिंदे
- नंदकुमार खोत
- जगदीश पोवार
- मधुकर निर्मळे
- मोहन घेवारी
- सुधाकर चोडणकर
- अनिल शिंदे
- उमेश जाधव
- राजू एडगे
- राजन पोवार
- राजाराम कुंभार
- रमेश जाधव
- रमेश कुलकर्णी
- दिलीप आचार्य
Author
Rohit Suratekar