Saturday, November 30, 2013

मागे वळून पाहताना भाग ७ : शुभारंभ

मागे वळून पाहताना
[ भाग ७ : शुभारंभ ]

शाळा काढल्यानंतर मी फक्त दहाच मुल घेतली होती. त्यावेळी माझ्या ओळखी फार नव्हत्या. कोल्हापुरात आमच्यासारख्या संस्थानिकांच्या बायकांनी अशा तर्हेने काम करणे हि कल्पनाच नवीन होती. सगळे लोक टवकारून बघत होते. हि काय लहर आहे अशी हेटाळणी करत होते. या कशा असाल काम करतात. मास्तरानीचा धंदा त्यांनी सुरु केलाय असे उद्गार कानावर येत होते. टीकाही होत होती. हे श्रीमंतीच खूळ आहे. किती दिवस टिकत बघूया, असंही म्हंटल जात होत. परंतु मी एक गोष्ट सांगते कि, आपलं संस्थांनी वातावरण असल तरी कोल्हापूर संस्थानात रिजन्सी कौन्सिल असल्यामुळे युरोपियन अधिकारी होते आणि त्या लोकांना बाल शिक्षण वगैरे गोष्टींच खूप कौतुक होत. मी सांगते, ज्या वेळी मी या कोर्सला जायचं ठरवलं तेव्हा मिचेल यांनी खूप कौतुक केल. त्यांनी प्रोत्साहन दिल. आणि मी जेव्हा शिकून परत आले, त्यावेळी इथे बाल छत्रपती होते. त्यांचे सेक्रेटरी भेटले. मला वाड्यावर बोलावून घेतलं. त्यांनी तुम्ही हि शाळा कुठे काढणार आहात? वगैरे सर्व चौकशी केली. मी सांगितलं, " मी कोल्हापुरात, माझ्या बंगल्यातच हि शाळा काढणार आहे." मी शाळेची माहिती दिली. ते म्हणाले, " आमच्या बाल छत्रपतींना तुमच्याकडे पाठवायचे आहे. त्यासाठी काय करायचं?" मी म्हंटल,"माझी एकाच अट आहे. छत्रपती म्हणून बाहेर मान मिळेल. पण इथे आमच्या शाळेत आल्यानंतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे राहायला हवं. हे तुम्हाला पटत असेल तर तुम्ही त्यांना पाठवा. नाही तर माझ्याकडे पाठवू नका." तेव्हा ते सेक्रेटरी म्हणाले, " आम्हाला अशा तऱ्हेचीच शाळा हवी आहे. अजून तो मुलगा लहान आहे. तेव्हा आम्ही त्याला तुमच्या शाळेतच पाठवू." पण दुर्दैवाने पुढ तो मुलगा गेला. बाल छत्रपती येणार म्हणून त्यांच्याबरोबर पद्माराजेही आमच्या शाळेत येणार होत्या. पण पुढे बाल छत्रपतीच आले नाहीत. त्यामुळे पद्माराजेही आल्या नाहीत.

मला माझे विद्यार्थी नावासह आठवतात. आणि शिक्षकान विद्यार्थ्यांशी इतकं जवळच नात निर्माण करायला हवं कि त्याचं नावसुद्धा आठवल पाहिजे. माझी भाची हीच माझी या शाळेची पहिली विद्यार्थिनी. दुसरा विद्यार्थी डॉ. सरलाताई भोसले यांचा मुलगा. तो आत्ताच अर्मितून निवृत्त झाला आहे. दिलीप भोसले त्याचे नाव. तो पावणे दोन वर्षाचा होता. त्यावेळी आमच्या शाळेत आला. अंगठा चोखत झोपलेला असायचा. उबेरॉय यांचा अरुण होता. आशिष होता. खूप विद्यार्थी या शाळेतून शिकून बाहेर पडलेत.


[ Read : Special Note for this article. ]  

0 comments:

Post a Comment