Monday, July 8, 2013

मागे वळून पाहताना भाग ६: अडी-अडचणी

मागे वळून पाहताना
[भाग ६: अडी-अडचणी]

अहमदाबाद इथे चार महिन्यांचा कोर्स मोन्तेसोरी बाईंच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. त्यावेळी मोन्तेसोरी बाई शिकाविण्यापुरत्या येत असत. परंतु त्यांनी आम्हाला जे शिक्षण दिल ते फार महत्वाच वाटत. माझ्या आयुष्याला नवी दिशा या शिक्षणान दिली. ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची सर्व शैक्षणिक साधने खरेदी केली आणि कोल्हापुरात शाळा काढायचं ठरवलं. त्यादृष्टीन वाटचाल सुरु केली. एक गोष्ट मनाशी निश्चित होती की, कुणाकड पैसा मागायचा नाही. त्यावेळी सरकारकडून फक्त चारशे रुपये मिळत होते. आता पाचशे रुपये मिळतात.
पैसे कुणाकडून मागायचे नाहीत तर मग या कामासाठी पैसे कुठून उभे करणार ? मग मी ठरवलं. मला जे दागिने मिळाले ते विकायचे आणि त्यातून हि शाळा काढायची. त्याप्रमान मी माझे दागिने विकले आणि त्यातून मी हि शैक्षणिक साधने घेतली.
हि शाळा नोव्हेंबर १९४६ मध्ये सुरु केली. १९४२ ते १९४६ ह्या चार वर्षांच्या काळात संस्था उभारणीच्या दृष्टीने विचार केला. मोन्तेसोरी बाई भारतात आलेल्या नसल्यामुळे मला लगेच हा अभ्यासक्रमही पूर्ण करता आला नाही. 


[ Read : Special Note for this article. ] 

0 comments:

Post a Comment