Saturday, June 9, 2012

मनातल्या कोंदणात

       साल होत १९८० माझ्या मनाने डी . ऐड . ला प्रवेश घ्यायाच निश्चित केल होत. प्रश्न होता आर्थिक बाबींचा. पण माझ्या वडिलांनी तोही सोडवला व मी  डी . ऐड . ला प्रवेश घेतला .कॉलेज च्या प्रिस्निपल होत्या मोहिनितई जोशी. मनाला नोहिनी घालणार असाच त्यांच व्यक्तिमत्वा होत. कॉलेज मध्ये  एक हुशार विद्यार्थिनी म्हणून नाव गाजल ते  मोहिनितईन्च्यामुळे. दोन वर्षाच्या कॉलेजच्या अवधीत परिचय अगदी दृढ़ जाला. एकंदरीत माझी सर्व परिस्थिती त्यांना समजुन चुकली. मझ्यासाथी त्यांचा आशीर्वादाचा व मदतीचा हात सदैव पुढे होता.  होता होता दोन वर्ष संपली. माझ्या नोकरीचा प्रश्न जसा मला भेडसावत होता तसा तो बाईनाही सतावत होता. मला कशी मदत करावी हा त्यांचा प्रश्न माईसाहेबानी सोडविला.  
     माईसाहेबना आपल्या एक हितचीन्तकासाठी एका सह्हायक शिक्षकाची गरज होती. माईसाहेबंच्या हेतुला पुर्तता देण्यासाठी मोहिनिताईनि मला शाहुपुरितिल बी. ऐड. कॉलेज मधे बोलावून घेतले. तिथेच माजी माईसाहेबांची पहिली भेट झाली.  मोहिनितईनि माझी ओळख करून दिली. त्याच दिवशी आपण एका उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या सानिध्यात आपण आलो आहोत याची जाणीव झाली.   
    सुरवातीच्या डी.एड. दिवसात तशी मी माईसाहेबंच्या बालमंदिराला भेट दिली होती. आर्थात त्या वेळी भेट देण्याचा हेतु असायचा तो तिथले कामकाज पाहने व शाळेतिल स्वागतच आनुभव घेणे. कारण आम्ही विद्यार्थिनी कॉलेज मधे अनेक शाळांना भेट देत होतो. पण आम्हा सर्व विद्यार्थिना चहा देऊन स्वागत करण्याची पद्धत फक्त याच शाळेत होती. माईसाहेबांच्या बालमंदिर मधे चाललेले कामकाज पाहून कधी कधी संशय यायचा की मुले कुठली इतक्या छान वस्तु करत आहेत . शिक्षकच करून चिकटवत असतिल. पण माझा संशय लवकरच दूर झाला.
    माईसाहेबंची बी. एड कॉलेजला भेट देऊन महिना उलटला आसेल. दरम्यानचा काळात मी कसबा बावडा इथे नोकरी धरली होती. आणि एक दिवस मला मोहिनी ताई यांचा फ़ोन आला " तुम्ही माईसाहेब यांना जाउन भेट त्यांचा शाळेत एक जागा रिकामी आहे." मी माझ्या जुन्या मुख्याध्यापकांना ही गोष्ट सांगितली. त्यानी मला सल्ला दिला," आहो एवढ्या मोठ्या प्रसिद्ध शाळेत तुम्हाला बोलवाने आले आहे तर अवश्य जा. आसा चान्स मिळत नाही". घरच्यांचा सल्ला घेउन मी मोंटेसरीच्या आवारात पाय टाकला. मानत धाकधुक होतीच.
   त्यावेळी माझ्याकडे नोकरीचा लेखी अर्ज वैगेरे काहीच नवता.बंगल्याच्या बागेताच श्री. शंकर मामा भेटले. निरोप बंगल्यात गेला व मला बंगल्यातुन बोलाविने आले. मझ्यासमोर एक तपस्वी व्यक्तिमत्व होते.आणि मला जाणवलं आपन हिमालायाचा सावलीत आलो आहोत.मला नोकरीचा अनुभव नाही असे समजल्यावर आश्वासक शब्द उमटले " अहो तुम्हाला अनुभव नाही तर मी तुम्हाला अनुभव देते, तुम्ही तिसरीच्या वर्गासाठी शिकवा " त्यावेळी माझ्यावर खुपच जबाबदारी होती. परिणामी नोकरीची ही अत्यंत आवश्कता होती.आपल्याला नोकरी मिळणार हे ऐकल्यावर मी आनंद शब्दत नाही सांगू शकत. मला त्या वेळी काडीचा न्हवे तर नावेचाच आधार लाभला होता माईसाहेबंच्या रुपाने.
   पहिले सहा महीने मा. माईसाहेब वर्गवार येत आसत. अनुभव देत असत. डी.एड. मी नंबरात आले तेव्हा आशिर्वाद्चा पहिला हात कोणाचा फिरला आसेल तर तो  माईसाहेब यांचाच! माझी नोकरी सुरु झाली .मी या संस्थेत कायमची झाले. माझे व माझ्या  मैत्रिनिचे स्वप्न साकार जाले. आम्ही जेव्हा बालमंदिर बघायला येत होतो तेव्हा माज्या मैत्रिणी येथील  कामकाज पाहून म्हणायच्या "सुधा तूला इथे नोकरी लागली पाहिजे तुझ्या गुणांचे चीज होइल" आणि झालाही तसच ! मला इथे नोकरी लागली. 
    मला इथून मिळालेल्या अनुभवाची शिदोरी खुप मोठी आहे . शिकविन्यातला खरा आनंद मला इथे मिळाला. शिकविण्यातल्या खाचा-खोचा मला इथे समजल्या.माझी अनेक श्रधास्थान मला  इथून लाभली.मला प्रगतीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या   गुरूस्थानी असणाऱ्या मा. पंडितबाई, माझ्या मनात प्रेरणा निर्माण करणाऱ्या प्रोत्साहन देणाऱ्या माझी सासु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मा. मकोटेबाई, मला पुढे जाण्यासाठी माझ्या मनात जिद्द  निर्माण करणारी माझी सखी सौ राजगुरु या सर्व जणी मला भेटल्या याच ठिकाणी.
   अर्थात आमची शाळा एक कुटुंबच आहे . कुटुंबातले हेवे दावे इथे अहेत .पण पुन्हा प्रेमाच वातावरण निर्माण होत .अर्थात या मागे आधाराचा एक हात आहे तो म्हणजे माईसाहेबनचा. एथले माझे सगळेच सहकारी चांगले आहेत.सर्वांच्या सहकरयावर मी आज पर्यंतची वाटचाल पार पाडली.
   आपल्या शिक्ष्केची नेहमीच प्रगति व्हावी असे माईसाहेबना वाटते.त्या साठी त्यानी अनेक मार्गांनी प्रयत्न केले .१९८३ साली त्यानी नविन उपक्रम्न्च्या संदर्भात त्यानी मला १० दिवसांच्या शिबिराठी पुणे इथे पाठविले .तसेच स्नेह्समेलनाची ची जवाबदारी चांगल्या रितीने पार पाडावी या साथी मला व सौ राजगुरु यां १० दिवसाच्या नाट्य शिबिराला पाठविले. शिक्षकांचे विषयाचे माहिती सखोल व्हावी म्हणून विविध प्रकारची पुस्तके कैससतेस इतर साहित्याच लगेच पाठपुरावा केला. आमच्या संस्थेचे ग्राथालय सुसज्ज आहे. 
   एका मान्यवर अशा संस्थेत मला काम करायची मला संधी मिळाली. माझ्या जीवनाला कही अर्थ प्राप्त झाला तो इथेच. अर्थात या सर्वांमागे असनारा प्रेरणा स्त्रोत माईसाहेब !!      


Author
V. G. Bhuyekar
[ Original Article from "सुवर्ण पंख" . Read Note for more information ]

3 comments:

  1. एडिटर, कृपया शुद्धलेखनाच्या चुका सुधारा, वाचताना त्रास होतो आणि इतक्या सुंदर अनुभवांची मजा घेता येत नाही.

    भुयेकर बाई, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना जे प्रेम दिले ते बघता असे वाटते की माईसाहेबांनी तुमच्यातला शिक्षकी बाणा आधीच ओळखला होता. तुम्ही ह्या शाळेत काम करुन अनुभवसमृद्ध झालाच, पण तुमच्या मार्गदर्शनाखाली कित्येक विद्यार्थी घडले, त्या सर्वांतर्फे तुम्हाला अनेकानेक धन्यवाद.

    -मैथिली

    ReplyDelete
  2. We are very sorry for our grammatical mistakes. We will definitely try to reduce them. Thank you.

    ReplyDelete
  3. Thanks for correcting it. I love this portal, cannot thank you enough for your good work.

    ReplyDelete