शिक्षणासारख्या ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रातही बेशिस्त व भ्रष्टाचार
सर्वत्र फोफावत असतानाच अभिमानाने नामोल्लेख करावा अशा फारच थोड्या संस्था
अस्तित्वात आहेत. इतर शैक्षणिक संस्थाना आदर्श व मार्गदर्शक ठरावी अशी
कोल्हापूर जिल्यातील एक नमवत संस्था म्हणजे "श्रीपंत अमात्य बालविकास
विश्वस्थ निधी"
आदर्श व संस्कारक्षम ज्ञानदानाने पवित्र कार्य गेली ५० वर्षे सातत्याने करीत १९९७ मध्ये सुवर्माहोत्सव साजरा करणारी माईसाहेब बावडेकरांची हि संस्था.
बालकांच्या कोवळ्या मनावर योग्य वयामध्येच व वेळेवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना वळण लागावे व चांगले शिक्षणही मिळावे म्हणून विशिष्ठ ध्येयाने प्रेरित होऊनच मा. माईसाहेब यांनी १९४६ साली सुरु केलेली हि संस्था. ऋषी मुनी वर्षोनी वर्षे तपशर्या करीत स्वतःच्या अध्यात्मिक उन्नती साठी !समाजाच्या, भावी पिढीसाठी बालकांच्या उज्वल भवितव्यासाठी उभे आयुष्य चंदनाप्रमाणे झिजणाऱ्या - वेचणाऱ्या माईसाहेब यांना खरोखरच शिक्षण क्षेत्रातल्या थोर तपास्वीनीच म्हणावे लागेल. - "शिक्षण तपस्विनी" !
कलाध्यापक म्हणून गेली १० वर्षे या या शाळेत काम करीत असतानाच मा. माईसाहेब यांच्या कार्याचा अगदी जवळून परिचय झाला. मा. माईसाहेब यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्व व शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदाना बद्दल मनोदय प्रगत करण्याची हि संधी मिळणे म्हणजे खरोखर भाग्याची गोष्ट आहे. स्मरणिकेच्या निम्मिताने हि संधी मिळाली याचा आनंद वाटतो. त्याच बरोबर मनोगत व्यक्त करताना माईसाहेब यांच्याबद्दल आदरयुक्त भीती हि वाटते.
"बाल देवो भवं" हे ब्रीद वाक्य घेवून सुरु केलेली हि संस्था ! ब्रीद वाक्यावर असलेली गोलातील चित्र मोठे अर्थपूर्ण आहे. मातेचे बोट भक्कमपणे धरून दिमाखात चाललेले मुल! हा आधाराचा हात दुसऱ्या कोणाचा नसून प्रत्यक्ष माईसाहेब यांचा ! या हाताच्या साक्षीनेच मग बालमंदिरची सुरवात होते. आज या संस्थेचा वाढलेला व्याप पहिला या यशामागे आशीर्वादाचा, मायेचा हात खंबीरपणे उभा आहे. आणि 'बाल विकास विश्वस्थ निधी' या संस्थेच्या नावातच बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबंध व तत्परता असल्याचे सांगितले आहे.
हे शिक्षण संस्था म्हणजे माईसाहेब यांनी चालवलेले एक कुटुंबच म्हणावे लागेल. मोन्तेसोरी बालमंदिर, मोन्तेसोरी प्राथमिक विद्यालय व सौ. न. श. पंत वालावलकर प्रशाला या तीनीही शाखा अविभक्त कुटुंबाचा भागच असून त्यावर माईसाहेब यांचा प्रेमळ वरदहस्त, मार्गदर्शन व प्रसंगी प्रीतियुक्त दराराहि आहे. त्यामुळे अत्यंत कडक शिस्तीत संस्कारक्षम वातावरणात या संस्थेचे काम चालते. तसा या शाळेचा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लौकिक व आदर्श आहे. म्हणूनच पालक काहीही करून आपल्या पाल्याला या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी अक्षरशः धडपडत असतात. या धडपडीत जे यशस्वी होतात ते स्वतःला भाग्यवान समजतात असे म्हंटले तर वावगे नाही. आणि प्रवेश मिळालेल्या बालकाचे तर भाग्याच उदयास येते.
Author
Ramesh V. Kulkarni
[ Original Article from "सुवर्ण पंख" . Read Note for more information ]