![]() |
Balmandir 1946 [See gallery for more pictures] |
कोल्हापूर संस्थानात 'बालमंदिर' हा विचार नवीन होता. या करिता लागणारा
अभ्यासक्रममी मार्च १९४५ मध्ये डॉ. मादाम मोन्तेसोरी यांच्या
मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. अभ्यासक्रम पूर्ण झाला पण या पद्धतीवर
चालणाऱ्या शाळा कोठेही पाहता आल्या नाहीत. बालमंदिर सुरु करण्यासाठी
लागणाऱ्या सर्व गोष्टींची योग्य प्रमाणात पूर्तता झाल्या शिवाय बालमंदिर
सुरु करायचे नाही असे मी ठरवले.
माझ्या बंगल्यातच एक जुनी कौलारू इमारत होती तिचा मी स्वयंपाकघरासाठी उपयोग
करत होते. ती जागा बालमंदिरकरिता वापरायची असे मी ठरवले. त्याप्रमाणे त्या
इमारतीची योग्य तर्हेने रंगरंगोटी व हव्या त्या सुधारणा करून ती जागा
बालमंदिरकरिता तयार केली.
आता साहित्याची तयारी ! बालमंदिर करिता लागणारी शैक्षणिक साहित्य मी
प्रत्यक्ष मुंबईला जाऊन 'जयचंद तलक्षी' या कंपनीचे खरेदी केले. इतर सर्व
साहित्य पुणे व मिळेल तेथून खरेदी केले. बालमंदिरचे जे साहित्य बाजारात
उपलब्ध नव्हते ते सर्व साहित्य श्री. शंकरमामा आणि मूर्तिकार श्री.
कृष्णाजी कारेकर यांचेकडून बनवून घेतले.
बाल्मान्दिराला लागणारे फर्निचर म्हणजे मुलांना लागणाऱ्या खुर्च्या, टेबले,
शेल्फ खाली बसून खेळता यावे असे निरनिराळे भौमितिक आकाराचे चौरंग मुलांना
आकर्षित करतील अशा रंगत रंगवून तयार करून घेतले. बेळगावला फर्निचर चांगले
बनवत होते म्हणून बेळगाववरूनच सर्व फर्निचर आणले.
आता प्रश्न होता बालमंदिरला लागणाऱ्या नोकरवर्गाचा, बालमंदिरात मुलांचे काम
करणे सोपे नाही. त्याकरिता अनुभवी मनसे पाहिजेत. म्हणून मी माझ्याकडे
माझ्या लहानपणा पासून काम करणाऱ्या तानुबाई हिला नेमून घेण्याचे ठरवले.
बालमंदिराची झाडलोट, मुलांचे पाणी भरणे, खाऊच्या ताटल्या मांडणे, शी , शूला
घेवून जाने हि सर्व कामे मी तानुबाईकडे सोपवली. माझे सर्व काम ती करत होती
त्यामुळे स्वच्छता , टापटीप , मुलांशी प्रेमळपनाणे वागणे या गोष्टी ती
चांगल्यातर्हेने असे मला वाटल्यामुळे तानुबाईकडे ती कामे सोपविली.
आमचे बालमंदिर हे त्यावेळच्या ताराबाई पार्कात आसपास पासून लांब असल्यामुळे मुलांना नेण्या-आणण्या करिता वाहनाची सोय करणे आवश्यकच होते. म्हणून लहान मुलांकरिता खास बस बनवून घेतली. मुलांच्या उंचीला योग्य अशी बाके त्यात ठेवली. माझ्याकडे काम करत असलेला माझा जुना ड्रायवर नारायणमामा यांच्याकडे हि कामगिरी सोपविली.
आता मी एका अनुभवी शिक्षिकेच्या शोधात होते. मी स्वतः जरी हा कोर्स केला असला तरी माझ्या वैयक्तिक जबाबदारीवर बालमंदिर चालवणे मला अवघड वाटले. कारण त्या पद्धतीवर चालणाऱ्या शाळा मला कोठेही पाहायला मिळालेल्या नव्हत्या व माझा स्वतःचा अनुभव शून्य . त्यामुळे मला सहकारी शिक्षिकेची गरज होती. सुदैवाने या क्षेत्रात काम केलेल्या श्री. मालुताई भडभडे या सहकारी मला मिळाल्या.
अश्या तर्हेने बालमंदिरची जमवाजमव व्हायला सहा महिन्याचा कालावधी लागला. १३ नोहेंबर १९४६ ला बालमंदिर या संस्थेचे उद्घाटन, त्यावेळचे कोल्हापूर संस्थानचे दिवाण सर थोमास ऑस्टिन यांच्या हस्ते संस्थांनी थाटात झाले.
बालमंदिराची सुरवात करताना मला विद्यार्थ्यांची उणीव कधीच भासली नाही . पालक आपोआपच या संस्थेकडे धाव घेवू लागले. जूनमध्ये बालमंदिरची संख्या ३०-३५ झाली. मी माझ्या वैयक्तिक जबाबदारीवर बालमंदिर चालवू शकते हा आत्मविश्वास आला आणि दिवसेंदिवस पालकांचा या शिक्षण पद्धतीवर पूर्ण विश्वास बसला. त्यामुळे मुलांची संख्या वाढू लागली. पालक काही मुलांना दुसऱ्या शाळेत पाठवायला तयार न्हवते. त्यामुळे चौथीपर्यंत अभ्यास मी बालमंदिरमध्ये करून घेत असे . चौथीच्या परीक्षेला बाहेरच्या शाळातून बसवत आहे आणि यातूनच पुढे प्राथमिक विभाग सुरु झाला.
बालमंदिरामध्ये गायनाला खूप महत्व आहे. मुलांना गाणी खूप आवडतात म्हणून सुरवातीस मी स्वतः गाणी घेत असे. पण गाण्याकरिता एक शिक्षक मला अचानक मिळाले. श्री. जाधव मास्तर हे त्यांचे नाव. पण ते 'सारंग' या नावानेच ओळखले जात. छोटी - छोटी गाणी ते मुलांना आवडीने शिकवायचे. ते शेवटपर्यंत बालमंदिरमध्ये काम करीत होते. त्यांची गाणी आजही बालमंदिरमध्ये शिकविली जातात.
बालमंदिरातील बालकांची वैयक्तिक तपासणीसुद्धा नियमितपणे होत असे. शाळेच्या एक पालक डॉ. सरलाताई भोसले यांनी कोणतेही मानधन न घेता नियमितपणे व आपलेपणाने हे काम केले. असे कार्यकारी सहकारी मला त्यावेळी लाभले म्हणूनच या छोट्या रोपट्याचे वृक्षामध्ये रुपांतर होऊ घातले.
Author
Maisaheb Bavdekar
( 1997 )
[ Original Article from "सुवर्ण पंख" . Read Note for more information ]