मागे वळून पाहताना
[ भाग ९ : पालक आणि शासन ]
[ Read : Special Note for this article. ]
[ भाग ९ : पालक आणि शासन ]
पालक जागरूक नाहीत. त्याचं मुलांकडे लक्ष नसत हि तक्रार मला
योग्य वाटत नाही. निदान माझातरी तसा अनुभव नाही. पालकांच्या बैठका आम्ही
घेतो. त्याला पालकांची संख्या भरपूर असते. जेवढ लक्ष देता येईल तेव्हड लक्ष
देतात. काही अपवाद त्याला असायचेच.
मुलाचं दप्तराच ओझ जेव्हड कमी होईल
तेव्हड कमी करायचा आम्ही प्रयत्न करतो. होमवर्क वही त्यान घरी घेवून जावी.
फेअर वह्या त्यान इथ ठेवाव्यात अशी आमची पद्धत आहे. मुलांच्या
व्यक्तीविकासाकड आणि त्याच्या अंगाच्या सुप्त गुणांना कसा वाव मिळेल याकड
लक्ष देतो. वाचनाच्या आवडीकड लक्ष देतो.
काही पालक आपल्या मुळातल व्यंग
सांगत नाहीत. त्याचा परिणाम असा होतो कि, ते व्यंग आम्हाला ज्यावेळी काळात
त्यावेळी बराच काळ निघून गेलेला असतो. हे व्यंग असणाऱ्या मुलांसाठी
वेगळ्या शाळा आहेत. त्यांच्यावर संस्कार कसे करावयाचे, त्यांना शिक्षण
कोणत्या पद्धतीन द्यायचं याच शास्त्र आहे. म्हणून पालकांनी आपल्या मुलाच
व्यंग सांगायला हवं, अस मला वाटत. एकदा एक पालक आले. त्यांनी सांगितलं,
"माईसाहेब, माझ्या मुलाला ऐकायला येत नाही, तो मुका आहे. पण तुमच्या शाळेत
त्याला घालायची इच्छा आहे". मी त्या मुलाला आनंदाने आमच्या शाळेत घेतलं.
शासनाने
ठरवून दिलेल्या शिक्षणाप्रमाणे आम्हाला शिकवावं लागत. परतू काही नव्या
गोष्टींची जर शाळेत आम्ही सुरवात केली तर या शासकीय अधिकार्यांना ते आवडत
नाही. आता हेच पाहना, मुलांना आता इंग्रजी आवश्यक आहे, हे मलाही मान्य आहे.
पण आपली मातृभाषा त्याला यायला नको का? मला कितीतरी लोकांनी इंग्रजी
माध्यमाची शाळा सुरु करायला सांगितलं होत. माझी त्याला हरकत नव्हती. परंतु
मला तरी असं वाटायचं कि, मुलाला प्रथम त्याच्या मातृभाषेतून शिक्षण मिळायला
हवं. त्याची मातृभाषा इंग्रजी असेल तर इंग्रजी जरूर शिकव, निदान चौथी
पर्यंत मातृभाषेतून त्याला मिळायला हवं. या तत्वाची मी आहे. म्हणून इंग्रजी
माध्यमाची चौथी पर्यंतची शाळा काढायचे मी नाकारल्यावर इंग्रजी माध्यमाच्या
शाळा सुरु झाल्या. आपली मुले चांगली इंग्रजी लिहू शकतात. वाचू शकतात.
परंतु इंग्रजी बोलायला ती मुल कमी पडतात. म्हणून मी आमच्या शाळेमध्ये एक
इंग्रजीचा तास ठेवला - पहिलीपासून. आणि त्याकरिता एक शिक्षिकापण नेमल्या.
त्यांनी येऊन मुलांशी संभाषण करायचं. चौथीला इंग्रजी लिपी शिकवायची. हा
प्रयोग आमच्याकडे अद्याप सुरु आहे. परंतु असा प्रयोग केला म्हणून आमच्या
शिक्षण खात्यान शेरेबाजी केली. अशा काही वेगळ्या आणि चांगल्या गोष्टी करत
असलं कुणी तर त्याला उत्तेजन देत नाहीतच. उलट त्यालाच नावं ठेवतात.
[ Read : Special Note for this article. ]
0 comments:
Post a Comment