मागे वळून पाहताना
[भाग ५: कल्पना ]
पुढे असं झाल. हे १९४२ साली अचानक गेले. गेल्यानंतर मला असं वाटायला लागलं
कि, माझ शिक्षण आधी पूर करायला हव. अगोदर राहिलेलं शिक्षण पुर करायचं मी
ठरविलं. आणि हे गेल्यावर महिन्या दोन महिन्यातच मी स्वतःला सावरलं आणि
शिक्षणाला सुरवात केली. आणि दहावी झाले. माझ्या मनात विचार आला कि, पदवीधर
होऊन काय करायचं ! आपण आपला नवा मार्ग चोखाळायला हवा. तो मार्ग असा असावा
कि, जो कधी कुणी चोखाळलेला नाही. आणि ज्याची आज खरी गरज आहे. याच्यासाठी
काय करावे याचा मी विचार करत होते.
आमचे पुण्याचे फॅमिली डॉक्टर कीर्तने होते. ते मला अगदी मुलीसारखे मानायचे. डॉक्टरांच्या दोन सुना - त्या वेळी डॉक्टर मोन्तेसोरी भारतात आल्या होत्या. त्यांच्या बालशिक्षणाचा कोर्स त्यांच्या सुनांनी तसेच हा कोर्स मी करावा असा सल्ला डॉक्टर कीर्तने यांनी दिला. आणि हा कोर्स झाल्यावर कोल्हापुरात या अभ्यासक्रमाची सुरवात करावी असं वाटल. कारण कोल्हापुरात अशी सोय त्यावेळी तरी नव्हती. "बाल मंदिर" हि कल्पना नवीन होती. पुण्या-मुंबईकडे अशा शाळा निघाल्या होत्या. तेव्हा समाजाला गरज आहे असं काही तरी वेगळ काम कराव असं मनाने घेतलं. हा मार्ग मी स्वीकारला. या बाबतीत आई-वडिलांनी तर प्रोत्साहन दिलंच.

[ Read : Special Note for this article. ]