गुरुवार दिनांक ६ नोहेंबर रोजी मा. माईसाहेब
यांच्याकडे स्मरणिका काढण्यासाठी तयार केलेली कागदपत्रे दाखविण्यासाठी
घेवून गेले. तेव्हा त्या म्हणाल्या , " माझ्याबद्दलच सर्वांनी जास्त लिहिले
आहे शाळेबद्दल वास्तविक लिहावयास हव होत. मी बालमंदिर सुरु केले आणि फक्त
दहा विध्यार्थ्यानिशी अस का ?"
मी थोडीशी स्तभ्दाच झाले . परत म्हंटल कि
माईसाहेब हे कोणालाच माहित नाही. आपल्यालाच माहित असणार . माधवी (त्यांची
नात) म्हणाली कि तू शाळेबद्दल थोडस लिही. माझ्या मनात येथेच विचार आले कि
आपण मा. माईसाहेब यांची पूर्वीची काही कागदपत्रे चालून पहावीत. दहावीचे
प्रक्टीकॅल आटोपून घरी आले. मा. माईसाहेब यांची थोडीशी कागदपत्रे चाळली. ती
वाचल्यावर वाटल कि आपण काहीतरी लिहाव . मा. माईसाहेब यांचा स्वभाव आणि
माझा स्वभावही अबोलच. त्या एवढ्या मोठ्या , त्यांच्याशी कसे मोकळेपणाने
बोलायचं , माझ्या मनात काहूर माजले आणि त्यातूनच हे लिहावयास झाले.
सन
१९४२ साली सौभाग्यालेने हरपल्यानंतर त्यांना दुखातून बाहेर काढण्यास
त्यांच्या मातोश्रींचा आणि त्यांचे डॉक्टर डॉ किर्तने यांचा सिंहाचा वाट
आहे. बालवाडी शिक्षण प्रसारक डॉ. मादाम मोन्तेसोरी त्यावेळी भारतात बालवाडी
शिक्षण पद्धतीचा प्रसार करीत होत्या. सुमारे सहा महिन्यांचा हा अभ्यासक्रम
मा. माईसाहेब यांना पूर्ण करण्यास त्यांच्या डॉक्टरांनी आणि मातोश्रींनी
प्रवृत्त केले त्यावेळी बालवाडीची संकल्पना नवीनच होती अभ्यासक्रमात लहान
मुलांना शिकविण्याच्या पद्धती , त्यांचे बालमानसशास्त्र , शैक्षणिक वातावरण
कसे तयार करावे, साहित्य कोणते असावे याबद्दलची पूर्ण माहिती दिली गेली
होती.
बालवाडी म्हणजे मुलांवर सुसंस्कार करून त्यांना चांगले
घडविण्याची केंद्रे आहेत . याची कल्पना माईसाहेब यांना आली. मनाची पूर्ण
तयारी करून , आत्मविश्वास निर्माण झाल्यावर माईसाहेब यांनी मोन्तेसोरी
पद्धतीचे बालमंदिर सन १९४६ मध्ये सुरु केले. पण हि पद्धत यशस्वी होण्यासाठी
लोकांचा विश्वास संपादन करण्याच्या दृष्टीने सुरवातीला अगदी १० मुलानिशी
शाळा सुरु केली. याचा उद्देश येवडाच होता कि समजा बालवाडीत काही अपयश आले
तर ते आपल्या पुरतेच मर्यादित न राहता मोन्तेसोरी पद्धतीतच दोष असल्याचा
लोकांचा गैरसमज होईल. सुरवातीला त्यांच्यावर खूप टीका टिप्पणी झाल्या. अनेक
उपहासात्मक कथा लिहिल्या गेल्या . पण कालांतराने हे वादळ थंड झाले. शाळा
व्यवस्थित सुरु झाली . आत्मविश्वास दुणावला. नंतर हळू हळू विद्यार्थ्यांची
संख्या वादळी . सन १९४८ मध्ये मादाम मोन्तेसोरी पुण्यात आल्या होत्या
त्यावेळी माईसाहेब त्यांना आपली कोल्हापुरातील बालवाडी पाहण्यास बोलाविले.
त्यांचा यथोचित सत्कारहि केला. मोन्तेसोरी बाईनी हि शाळा पहिली. समाधान
व्यक्त करून हि शाळा आंतरराष्ट्रीय मोन्तेसोरी केंद्रास (ए. एम. आय. )
जोडून घेतली.
Author
A.D.Vardhe
0 comments:
Post a Comment