About our School

Find out a little information about our school and its foundation.

The Students

Find out your Batch-mates, Alumni and add your information

The History

Know some known and unknown facts about our school.

Gallery

Pictures which will refresh your memories !

Contact us

Contact us and leave Feedback.

Friday, June 22, 2012

चिरायू भव !!

श्री पंत अमात्य बाल विकास विश्वस्त निधी या संस्थेचा बाल्मान्दिरचा सुवर्ण महोस्ताव साजरा होत आहे समजल्यावर मला आनंद झाला. मी या संस्थेत विश्वात म्हणून काम केले आहे. या संठ्स्तेची झालेली भरभराट निश्चितच अभिमानास्पद आहे. या बाल्मान्दिरची सुरवात मा. माईसाहेबानी सन 1946 साली अवघ्या 10 मुलानिशी केली. त्यांचा आणि माझा परिचय झाल तो असा -मी हि मौंतेसरी चा कोर्स करून कोल्हापुरात आलो होतो. त्या वेळी मौंतेसरी असोसिएशन करण्याच्या निमिताने त्यांची आणि माझी भेट झाली.आम्हा दोघांच्या विचाराची आणि कार्याची दिशा एकच असल्याने जवळीक निर्माण झाली. सहकार्य वाढत गेले व पुढे मी या संस्थेच विशास्थ हि झालो. हे सर्व कार्य करीत असताना अनेक उपक्रम हि राबवले व बालशिक्षण आधिक गतिमान समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणजे माईसाहेबानी "नव्या जगासाठी शिक्षण" हे पुस्तक माझ्याकडून  अनुवादित करून घेतले, या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ कोल्हापुरात मादाम मौंतेसरी यांचा हस्ते झाला. या प्रसंगी मादाम मौंतेसरी यांचे भाचेही त्यांचा सोबत होते. त्यांनी माईसाहेबाची शाळा पहिली. संभाषण पद्धती व 3-4खोल्यातील बसण्याची पद्धत पाहून समाधान व्यक्त केले.

शाळेची साधने मुंबई वरून "जयचंद तालाक्षी " यांच्या कडून आणली होती.साधनांचा योग्य तो वापर करणे , मुलाना मुक्तपणे साधने हातालु देणे या गोष्टी पाहून मादाम मौंतेसरी यांना आनंद झाला आणि माईसाहेबानच्या कडे पाहून त्या म्हणाल्या "YOU ARE LITTLE MONTESSORY " आणि माझ्याकडे पाहून म्हणाल्या "You Are Power Behind Her" याचा मला सार्थ अभिमान वाटतो आणि मला याची खात्री झाली कि त्या बाल शिक्षणाला वाहून घेतलेल्या "लिटल मौंतेसरी " च आहेत. 

माईसाहेबानच्या शाळेला 25 वर्षे पूर्ण झाली त्या वेळी त्या वेळी मोठा समारंभ करण्यात आला या समारंभात शिक्षण क्षेत्रातील अनुताई वाघ, गोपीनाथ तळवळकर व जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक दिन्कारावाजी मुद्रले आदि मान्यवर उपस्थित होते.

श्रीमंतीची झूल झुगारून पंढरी साडी परिधान करून शिकवताना रंगलेले पहिले कि शंका येते याच का त्या बावड्याच्या राणी साहेब? असा प्रश्न पडतो .शिक्षक ,कर्मचारी यांचा सुख दुखत, अडीअडचणीत क्रियाशील राहून त्या त्यांना सढळ हाताने मदत करायचा. त्यांचा इतकी निष्ठावान क्रियाशील स्त्री माझ्या आठवणीत दुसरी नाही.

माईसाहेबाना त्यांचा कार्यात, या क्षेत्रातील जाणकार  अशी एक मैत्रीण सौ नलिनीताई कबनूर यांच्या रूपाने मिलाली. 1950साली "नूतन बालशिक्षण संघ , कोल्हापूर " ची शाळा स्थापन झाली .कोल्हापुरातील या शाखेत आम्हाला घेऊन "बाल शिक्षिका ट्रेनिंग कोर्सेस " चालविलेले .कोल्हापुरातील नामवंत व्यापारी व शिक्षा प्रेमी "मा. शां  कृ पंत वालावारकर  "साहेबांनी माईसाहेबाना मी सांगितले "मी तुमच्या पाठीशी आहे निश्चिंत राहा".

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी माईसाहेबानच्या कार्य्कार्नितून राजीनामा दिला .माल वाटते हे एक परीने उत्तमच झाले .कारण या मुले मा .सुनीलकुमार लवटे यांसारखे निष्ठावान सहाध्यायी मिळाले .

 आज या संथेने सुरु केलेल्या बालमंदिर चा सुवर्ण महोत्सव होत आहे याच विशेष आनंद मला होतो आहे कारण मणजे सुवर्ण महोत्सवी बाल्मान्दिर्च्या वाटचालीत मलाही माझ्या परीने सहभाग देता आला. या संथेची उत्तरौत्तर अशीच भरभराट होवो !

          श्री. रा. व . शेवडी गुरुजी
                माजी विशवस्त
श्री पंत अमात्य बाल विकास विश्वस्त निधी
   शब्दांकन :श्रीमती मंदाकिनी पंडित        

[ Original Article from "सुवर्ण पंख" . Read Note for more information ] Editor: Amey Patil
                                                                                  

Saturday, June 9, 2012

मनातल्या कोंदणात

       साल होत १९८० माझ्या मनाने डी . ऐड . ला प्रवेश घ्यायाच निश्चित केल होत. प्रश्न होता आर्थिक बाबींचा. पण माझ्या वडिलांनी तोही सोडवला व मी  डी . ऐड . ला प्रवेश घेतला .कॉलेज च्या प्रिस्निपल होत्या मोहिनितई जोशी. मनाला नोहिनी घालणार असाच त्यांच व्यक्तिमत्वा होत. कॉलेज मध्ये  एक हुशार विद्यार्थिनी म्हणून नाव गाजल ते  मोहिनितईन्च्यामुळे. दोन वर्षाच्या कॉलेजच्या अवधीत परिचय अगदी दृढ़ जाला. एकंदरीत माझी सर्व परिस्थिती त्यांना समजुन चुकली. मझ्यासाथी त्यांचा आशीर्वादाचा व मदतीचा हात सदैव पुढे होता.  होता होता दोन वर्ष संपली. माझ्या नोकरीचा प्रश्न जसा मला भेडसावत होता तसा तो बाईनाही सतावत होता. मला कशी मदत करावी हा त्यांचा प्रश्न माईसाहेबानी सोडविला.  
     माईसाहेबना आपल्या एक हितचीन्तकासाठी एका सह्हायक शिक्षकाची गरज होती. माईसाहेबंच्या हेतुला पुर्तता देण्यासाठी मोहिनिताईनि मला शाहुपुरितिल बी. ऐड. कॉलेज मधे बोलावून घेतले. तिथेच माजी माईसाहेबांची पहिली भेट झाली.  मोहिनितईनि माझी ओळख करून दिली. त्याच दिवशी आपण एका उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या सानिध्यात आपण आलो आहोत याची जाणीव झाली.   
    सुरवातीच्या डी.एड. दिवसात तशी मी माईसाहेबंच्या बालमंदिराला भेट दिली होती. आर्थात त्या वेळी भेट देण्याचा हेतु असायचा तो तिथले कामकाज पाहने व शाळेतिल स्वागतच आनुभव घेणे. कारण आम्ही विद्यार्थिनी कॉलेज मधे अनेक शाळांना भेट देत होतो. पण आम्हा सर्व विद्यार्थिना चहा देऊन स्वागत करण्याची पद्धत फक्त याच शाळेत होती. माईसाहेबांच्या बालमंदिर मधे चाललेले कामकाज पाहून कधी कधी संशय यायचा की मुले कुठली इतक्या छान वस्तु करत आहेत . शिक्षकच करून चिकटवत असतिल. पण माझा संशय लवकरच दूर झाला.
    माईसाहेबंची बी. एड कॉलेजला भेट देऊन महिना उलटला आसेल. दरम्यानचा काळात मी कसबा बावडा इथे नोकरी धरली होती. आणि एक दिवस मला मोहिनी ताई यांचा फ़ोन आला " तुम्ही माईसाहेब यांना जाउन भेट त्यांचा शाळेत एक जागा रिकामी आहे." मी माझ्या जुन्या मुख्याध्यापकांना ही गोष्ट सांगितली. त्यानी मला सल्ला दिला," आहो एवढ्या मोठ्या प्रसिद्ध शाळेत तुम्हाला बोलवाने आले आहे तर अवश्य जा. आसा चान्स मिळत नाही". घरच्यांचा सल्ला घेउन मी मोंटेसरीच्या आवारात पाय टाकला. मानत धाकधुक होतीच.
   त्यावेळी माझ्याकडे नोकरीचा लेखी अर्ज वैगेरे काहीच नवता.बंगल्याच्या बागेताच श्री. शंकर मामा भेटले. निरोप बंगल्यात गेला व मला बंगल्यातुन बोलाविने आले. मझ्यासमोर एक तपस्वी व्यक्तिमत्व होते.आणि मला जाणवलं आपन हिमालायाचा सावलीत आलो आहोत.मला नोकरीचा अनुभव नाही असे समजल्यावर आश्वासक शब्द उमटले " अहो तुम्हाला अनुभव नाही तर मी तुम्हाला अनुभव देते, तुम्ही तिसरीच्या वर्गासाठी शिकवा " त्यावेळी माझ्यावर खुपच जबाबदारी होती. परिणामी नोकरीची ही अत्यंत आवश्कता होती.आपल्याला नोकरी मिळणार हे ऐकल्यावर मी आनंद शब्दत नाही सांगू शकत. मला त्या वेळी काडीचा न्हवे तर नावेचाच आधार लाभला होता माईसाहेबंच्या रुपाने.
   पहिले सहा महीने मा. माईसाहेब वर्गवार येत आसत. अनुभव देत असत. डी.एड. मी नंबरात आले तेव्हा आशिर्वाद्चा पहिला हात कोणाचा फिरला आसेल तर तो  माईसाहेब यांचाच! माझी नोकरी सुरु झाली .मी या संस्थेत कायमची झाले. माझे व माझ्या  मैत्रिनिचे स्वप्न साकार जाले. आम्ही जेव्हा बालमंदिर बघायला येत होतो तेव्हा माज्या मैत्रिणी येथील  कामकाज पाहून म्हणायच्या "सुधा तूला इथे नोकरी लागली पाहिजे तुझ्या गुणांचे चीज होइल" आणि झालाही तसच ! मला इथे नोकरी लागली. 
    मला इथून मिळालेल्या अनुभवाची शिदोरी खुप मोठी आहे . शिकविन्यातला खरा आनंद मला इथे मिळाला. शिकविण्यातल्या खाचा-खोचा मला इथे समजल्या.माझी अनेक श्रधास्थान मला  इथून लाभली.मला प्रगतीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या   गुरूस्थानी असणाऱ्या मा. पंडितबाई, माझ्या मनात प्रेरणा निर्माण करणाऱ्या प्रोत्साहन देणाऱ्या माझी सासु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मा. मकोटेबाई, मला पुढे जाण्यासाठी माझ्या मनात जिद्द  निर्माण करणारी माझी सखी सौ राजगुरु या सर्व जणी मला भेटल्या याच ठिकाणी.
   अर्थात आमची शाळा एक कुटुंबच आहे . कुटुंबातले हेवे दावे इथे अहेत .पण पुन्हा प्रेमाच वातावरण निर्माण होत .अर्थात या मागे आधाराचा एक हात आहे तो म्हणजे माईसाहेबनचा. एथले माझे सगळेच सहकारी चांगले आहेत.सर्वांच्या सहकरयावर मी आज पर्यंतची वाटचाल पार पाडली.
   आपल्या शिक्ष्केची नेहमीच प्रगति व्हावी असे माईसाहेबना वाटते.त्या साठी त्यानी अनेक मार्गांनी प्रयत्न केले .१९८३ साली त्यानी नविन उपक्रम्न्च्या संदर्भात त्यानी मला १० दिवसांच्या शिबिराठी पुणे इथे पाठविले .तसेच स्नेह्समेलनाची ची जवाबदारी चांगल्या रितीने पार पाडावी या साथी मला व सौ राजगुरु यां १० दिवसाच्या नाट्य शिबिराला पाठविले. शिक्षकांचे विषयाचे माहिती सखोल व्हावी म्हणून विविध प्रकारची पुस्तके कैससतेस इतर साहित्याच लगेच पाठपुरावा केला. आमच्या संस्थेचे ग्राथालय सुसज्ज आहे. 
   एका मान्यवर अशा संस्थेत मला काम करायची मला संधी मिळाली. माझ्या जीवनाला कही अर्थ प्राप्त झाला तो इथेच. अर्थात या सर्वांमागे असनारा प्रेरणा स्त्रोत माईसाहेब !!      


Author
V. G. Bhuyekar
[ Original Article from "सुवर्ण पंख" . Read Note for more information ]