About our School

Find out a little information about our school and its foundation.

The Students

Find out your Batch-mates, Alumni and add your information

The History

Know some known and unknown facts about our school.

Gallery

Pictures which will refresh your memories !

Contact us

Contact us and leave Feedback.

Wednesday, December 4, 2013

समारोप

समारोप

माईसाहेब यांच्या जन्मदिनादिवशी , ४ डिसेंबरला , मागच्या वर्षी आम्ही "मागे वळून पाहताना" हि लेखमाला सुरु केली होती. आज या लेखमालेतील शेवटचा लेख आम्ही प्रकाशित करत आहोत. या लेखमालेला भरपूर प्रतिसाद मिळाला. भरपूर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या . या प्रतिसादांचा आणि प्रतिक्रियांचा विचार करून आम्ही लवकरच दुसरी लेख मला सुरु करायचा विचार करत आहे. या लेखमालेमध्ये विद्यार्थ्यांची मनोगते असतील.
जर आपल्याला काही मनोगत व्यक्त करायचे असेल किंवा काही आठवणी सांगायच्या असतील तर दिलखुलासपणे आमच्याकडे पाठवा.

या लेखमालेतील सगळे लेख पाहण्यासाठी येथे जा.

आपले विश्वासु
Editorial Team,
Maisaheb Bavdekar Alumni Portal

मागे वळून पाहताना भाग १०: वेगळेपण

मागे वळून पाहताना
[ भाग १०: वेगळेपण ]

हा एवडा व्याप म्हणजे पैशाचा प्रश्न आहे. आमच्या शाळेची फी जरा जास्त आहे. पण या फीशिवाय दुसरा पैशाचा असा मार्ग नाही. अनुदान मी घेत नाही, आणि ते घ्यायचं नाही असं पहिल्यापासून मी ठरवलं आहे. त्यामुळे येणाऱ्या फीतून भागवावे लागते. फी जास्त असल्याची पालकांना कल्पना आहे, शिक्षकांनाहि आहे.
शिक्षकांना ज्यावेळी मी नोकरीला घेते त्यावेळी पूर्ण कल्पना देते. शिक्षकांना जास्तीत जास्त पगार कसा देता येईल ते मी पाहते. हे काबुल असेल तरच शाळेत या असे सांगते. मात्र जो मी पगार सांगेन तेवढा पगार मी देते. त्यात कमी जास्त होणार नाही. त्यामुळे दोन वह्यांचा हिशोब मी कधी ठेवत नाही. आणि  जवळ जवळ पंचवीस-तीस वर्षे शिक्षक माझ्याकडे आहेत.
घरातले संस्कार आणि शाळेतले संस्कार यात फरक पडतो आहे. मात्र टी.व्ही. वरील कोणते कार्यक्रम आपल्या मुलांनी बघावेत, कोणते बघू नयेत यात पालकांनीच लक्ष घालायला नको का ? या दृष्टिन पालक जागरूक पाहिजेत.
मी संस्था सुरु केली. ती व्यवस्थित चालवली. मला सहकारी चांगले मिळाले. संस्था रजिस्टर झाली आहे. त्याचा ट्रस्ट आहे. सुदैवाने मला विश्वासही चांगले मिळाले आहेत. त्यामुळ संस्था वाढतच जाईल. याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही.
मी खूप बोलले. ऐंशी वर्षाच्या प्रवासानंतर थोड मग वळून पाहताना मला समाधान वाटत. या संस्थेची पन्नास वर्षे हेच माझ आयुष्य समजते. कारण बाल मंदिरच नाव खेडोपाडी झाल आहे. सुदैवाने बालशिक्षणाच्या बाबतीत सरकार आता जागृत झाल आहे. या विभागात सरकारांन कधी लक्षच घटल नव्हत, बाल शिक्षण हा शिक्षणाचा एक भाग आहे हे त्यांनी कधीच मानलेल नव्हत. परंतु सुदैवानं हा शिक्षणाचा महत्वाचा भाग आहे हे शासनाच्या लक्षात अल आहे. त्या दृष्टिन त्यांनी प्रयत्न सुरु केलेत.
विनानुदानित संस्था म्हणून शासनाकडून थोडाफार त्रास होतो. दहावीला परवानगी मिळविण्याच्या बाबतीत आम्हाला खूप अडचणी आल्या. पण त्यातून आम्ही अनेकांच्या मदतीन पार पडलो. आणि खर सांगायचं तर पालकाच आमच्या मागे खंबीरपणाने उभे होते. हा महत्वाचा भाग आहे.
वास्तविक खर पाहायचं तर हायस्कूल काढायचा माझा बेत नव्हता. पहिली ते चौथी आणि बालमंदिर एवढाच माझ कार्यक्षेत्र होत. खर तर बाल्मान्दिरच. परंतु पालकांच्या आग्रहातून माझ्या अनिच्चेतून हयास्कुलाची भरणी झाली. संस्थेची इमारत तीही माझ्या कल्पनेप्रमाणे उभी राहिली. याच सर श्रेय मी पालकांना देते. आणि सर्वात मोठ श्रेय शांताराम पंत वालावलकर यांना आहे.
या इमारतीविषयी ती पाहून मला अनेकजण विचारतात. इतर शाळेसारखी आपली ठोकळेबाज इमारत नसावी असं मला वाटत होत. आपली हि शाळेची इमारत वेगळी व्हावी म्हणून ज्यावेळी मला प्लान दाखविले तेव्हा त्या अर्कितेक्ट्ना मी म्हंटल, काही तरी वेगळ करा. या शाळेची इमारत इतर शाळेपेक्षा वेगळी आहे असं लोकांना वाटेल. मध्यभागी आपण उभे राहिलो तर सर्व वर्गावर लक्ष देता येत. हेच या इमारतीच वैशिष्ट आहे. 


[ Read : Special Note for this article. ]     

Monday, December 2, 2013

मागे वळून पाहताना भाग ९ : पालक आणि शासन

मागे वळून पाहताना
[ भाग ९ : पालक आणि शासन ]

पालक जागरूक नाहीत. त्याचं मुलांकडे लक्ष नसत हि तक्रार मला योग्य वाटत नाही. निदान माझातरी तसा अनुभव नाही. पालकांच्या बैठका आम्ही घेतो. त्याला पालकांची संख्या भरपूर असते. जेवढ लक्ष देता येईल तेव्हड लक्ष देतात. काही अपवाद त्याला असायचेच.
मुलाचं दप्तराच ओझ जेव्हड कमी होईल तेव्हड कमी करायचा आम्ही प्रयत्न करतो. होमवर्क वही त्यान घरी घेवून जावी. फेअर वह्या त्यान इथ ठेवाव्यात अशी आमची पद्धत आहे. मुलांच्या व्यक्तीविकासाकड आणि त्याच्या अंगाच्या सुप्त गुणांना कसा वाव मिळेल याकड लक्ष देतो. वाचनाच्या आवडीकड लक्ष देतो.
काही पालक आपल्या मुळातल व्यंग सांगत नाहीत. त्याचा परिणाम असा होतो कि, ते व्यंग आम्हाला ज्यावेळी काळात त्यावेळी बराच काळ निघून गेलेला असतो. हे व्यंग असणाऱ्या मुलांसाठी वेगळ्या शाळा आहेत. त्यांच्यावर संस्कार कसे करावयाचे, त्यांना शिक्षण कोणत्या पद्धतीन द्यायचं याच शास्त्र आहे. म्हणून पालकांनी आपल्या मुलाच व्यंग सांगायला हवं, अस मला वाटत. एकदा एक पालक आले. त्यांनी सांगितलं, "माईसाहेब, माझ्या मुलाला ऐकायला येत नाही, तो मुका आहे. पण तुमच्या शाळेत त्याला घालायची इच्छा आहे". मी त्या मुलाला आनंदाने आमच्या शाळेत घेतलं.
शासनाने ठरवून दिलेल्या शिक्षणाप्रमाणे आम्हाला शिकवावं लागत. परतू काही नव्या गोष्टींची जर शाळेत आम्ही सुरवात केली तर या शासकीय अधिकार्यांना ते आवडत नाही. आता हेच पाहना, मुलांना आता इंग्रजी आवश्यक आहे, हे मलाही मान्य आहे. पण आपली मातृभाषा त्याला यायला नको का? मला कितीतरी लोकांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करायला सांगितलं होत. माझी त्याला हरकत नव्हती. परंतु मला तरी असं वाटायचं कि, मुलाला प्रथम त्याच्या मातृभाषेतून शिक्षण मिळायला हवं. त्याची मातृभाषा इंग्रजी असेल तर इंग्रजी जरूर शिकव, निदान चौथी पर्यंत मातृभाषेतून त्याला मिळायला हवं. या तत्वाची मी आहे. म्हणून इंग्रजी माध्यमाची चौथी पर्यंतची शाळा काढायचे मी नाकारल्यावर इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु झाल्या. आपली मुले चांगली इंग्रजी लिहू शकतात. वाचू शकतात. परंतु इंग्रजी बोलायला ती मुल कमी पडतात. म्हणून मी आमच्या शाळेमध्ये एक इंग्रजीचा तास ठेवला - पहिलीपासून. आणि त्याकरिता एक शिक्षिकापण नेमल्या. त्यांनी येऊन मुलांशी संभाषण करायचं. चौथीला इंग्रजी लिपी शिकवायची. हा प्रयोग आमच्याकडे अद्याप सुरु आहे. परंतु असा प्रयोग केला म्हणून आमच्या शिक्षण खात्यान शेरेबाजी केली. अशा काही वेगळ्या आणि चांगल्या गोष्टी करत असलं कुणी तर त्याला उत्तेजन देत नाहीतच. उलट त्यालाच नावं ठेवतात. 


[ Read : Special Note for this article. ]    

मागे वळून पाहताना भाग ८: नियम

मागे वळून पाहताना
[ भाग ८: नियम ]

हि शाळा आपोआपच वाढायला लागली. मी १० विद्यार्थी ज्यावेळी घेतले त्यावेळी माझ्या ओळखी नव्हत्या. कोल्हापुरातच राहायचं मी मनाशी ठरवलं होत, हेच कार्यक्षेत्र मी निवडल होत. आमच्या शाळेचे उद्घाटन झाल. त्यावेळी कोल्हापूरचे पंतप्रधान समारंभाला आले होते. युरोपियन होते. त्यांना मराठी येत नव्हत. इथले बरेच लोक त्यावेळी समारंभाला आले होते. संस्थांनी शामियाना उभा केला होता. या समारंभानंतर पाच-दहा लोकांनी शाळेत आपल्या मुलाची नाव नोंदविली. अश्या तऱ्हेची शाळा कोल्हापुरात नव्हती. विद्यापीठ संस्थेची शाळा होती. पण त्यावेळी ती फारशी प्रसारात नव्हती. हळूहळू हि विद्यार्थी संख्या वाढायला लागली. शाळा वाढीसाठी मला जाहिरात अशी कधी करावी लागली नाही. विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मागणी असते. परंतु मीच स्वतःवर काही बंधन घालून घेतली आहेत. सध्या सातशे-साडेसातशे विद्यार्थी आहेत. प्रवेशासाठी पूर्वी शाळेच्या आवारात रात्री झोपायला येणारे पालक मी पहिले. मला ते बरे वाटेना. म्हणून मी प्रवेशाबद्दल ठराविक तारखेपर्यंत पालकांनी पत्रे पाठवायची पद्धत सुरु केली. विद्यार्थ्यात हा चांगल, तो वाईट असा भेदभाव केला नाही. प्रवेशासाठी मुलांच्या मुलाखती घेण, पालकांच्या मुलाखती घेण हा प्रकार अजिबात नाही.
आता हि शाळा दहावीपर्यंत झाली आहे. या पंधरा -वीस वर्ष्यात आमच्या शाळेच नाव खूप झाल आहे. आत्तासुद्धा प्रवेशाची दोन वर्षांची माझी यादी तयार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याच प्रवेश घेतल्यापासून शाळा सोडून जाईपर्यंत रेकॉर्ड असतं. शाळा सोडून जाताना ती फाईल त्यांच्याकड परत दिली जाते. मुलाकड वैयक्तिक लक्ष देण हे मी प्रथमपासूनच कटाक्षाने पळाल आहे. मुलांच्या सवयी, आवडीनिवडी याबाबतीत शिक्षकांना प्रत्येक मुलाची माहिती हवी. मुलांशी इतक्या प्रेमाने वागाल पाहिजे कि, त्यान घरातल्या गोष्टी विश्वासान तुमच्या जवळ सांगितल्या पाहिजेत. आईजवळ मुल जस विश्वासान बोलत तसच त्या मुलान शिक्षकाजवळ बोलायला हवं. या पद्धतीच शिक्षकांनी मुलाशी वागाव. हे धोरण आजपर्यंत मी कायम ठेवलं आहे. आजही माझ्या शाळेतले शिक्षक मुलांना नावाने बोलावतात. प्रेमाने वागवतात. सध्या वर्गात साठ-साठ ,प्रसंगी सत्तर-सत्तर मुल आहेत. तरीसुद्धा मुलाकडे वैयक्तित लक्ष दिल पाहिजे. जो मुलगा अभ्यासात कमी असेल त्याला आम्ही पुढे बसवतो. त्या पालकांना बोलावून घेतो. त्यांना त्या मुलाच्या अभ्यासाविषयी आणि अन्य गोष्टींविषयी वारंवार सांगितलं जात. त्या मुलाची प्रगती होईल एवढे आम्ही पाहतो.


[ Read : Special Note for this article. ]