About our School

Find out a little information about our school and its foundation.

The Students

Find out your Batch-mates, Alumni and add your information

The History

Know some known and unknown facts about our school.

Gallery

Pictures which will refresh your memories !

Contact us

Contact us and leave Feedback.

Sunday, October 21, 2012

कृतज्ञता

मी फक्त म. स. सी. झाले आणि घरात. आता का करायचे ? मोठा प्रश्न. कॉलेजला प्रवेश नाही कारण माझे वडील सनातनी विचाराचे, मुलीनी जास्त शिकायचे नाही,बिघडतात, दाराच्या बाहेर साधे फिरायला हि जाऊ देत नसत. माझ्या मोठ्या बहिणी वयाच्या ११ वर्षापासून घराच्या आत. पुरुषाशी साधे बोलायचे हि नाही. समोर तर बिलकुल जाऊ देत नसत. थोडक्यात गोषा पद्धत होती, अशा परिस्थितीत मा. माईसाहेबांनी मला त्यांच्या शाळेत काम करण्याची संधी दिली. माझे नशिबाच पालटून गेले. वडिलांचा  माईसाहेबांनशी परिचय होताच वर शाळा हि आमच्या जवळ, अगदी तारेच्या पलीकडे. केवळ माईसाहेबांनची शाळा, तेथील वातावरण माहित असल्यामुळे  मला वडिलांची शाळेत काम करण्याची परवानगी मिळाली. माझा आनंद गगनात मावेना कुठेही न जाता त्यांच्या बरबोर जाने व परत येणे अशी सक्त ताकीद मला होती. हळूहळू वडिलांच्या स्वभावात बदल होत गेला.
मला मोन्तेसारीच्या दुसर्या गटाला मार्गदर्शन कसे कार्याचे हे माईसाहेबांनी शिकवले. प्रत्येक गोष्ट समजून सांगत. मी खूप उत्साहाने एक वेगळ्या उमिडीने काम करू लागले. त्या कामात मला खूप आनंद वाटू लागला. जास्तीत जास्त वेळ शाळेत घालवत असे. गुरुवारी सुट्टी असे काही नवीन साधने करायची असली कि आम्ही एकत्र बसत असू. कधी कधी मी व माईसाहेब १२ ते ४ एकत्र असायचो. इव्शेष म्हणजे माझी मुलाखत वैगेरे काही नाही. माझे प्रमाण पत्र काही पहिले नाही. ट्रेनिंग तर नाहीच . त्यांच्या हाताखाली मी बरेच शिकले, वक्तशीरपणा, टापटीप, मुलांकडे वाय्क्तीत लक्ष देणे. मुलांना धाक धाख्वायला हातात पट्टी घेतलेली त्यांना आवडत नसे. रागावत म्हणत, "आधी पट्टी ठेव "
माझे काम त्यांना आवडू लागले . मुलांची अभ्यासातली प्रगती पाहून समाधानाचे शब्द ऐकवले. मलाही खूप आनंद झाला व स्फूर्ती मिळाली. पुढे मी कॉलेजला जायचा निर्णय केला. मला कधी वेळ होई त्या म्हणता अडाव बिना सांगून जात जा. त्यांनी मला शिक्षणासाठी प्रोत्शाहन दिले. आर्थिक सहाय्य हि केले. त्या वेळी आमच्या घराची परिस्थिती वेगळी होती. माईसाहेबांना सर्व माहित होते. त्या म्हणल्या "बंगल्यात येऊन अभ्यास करत जा " किती आनंद झाला मला हे ऐकून, किती अभामांची गोष्ट आहे ही.
 मी कॉल्लेगेच्या पहिल्या वर्षी सेकंद क्लास मिळवला. पुस्तकांचा,गाईडचा अभाव पण माईसाहेबांनच्या संगतीत राहून सवय लागली कष्ट करायची पास झाले त्या वेळी त्यांनी माझे फार कौतुक केले. याच दरम्यान मा.कै. पद्मश्री अनुताई,माईसाहेब, मी वारणा नगरला तीन दिवसांचे शिबीर घेण्यासाठी गेलो होतो. तेथेच माझा निकाल समजला. त्यांच्या समोरही कौतक करताना माईसाहेब म्हणाल्या "फार कष्टाने शिकली." यावर अनुताई म्हणाल्या आपण हिचा सत्कार केले पहिले बस माझ्या कष्टाचे फळ तिथेच मिळाले. पुढे अनुताईनि पत्रात लिहिले "तू ब. अ. एड तुला जीवनात त्याचा उपयोग होईल " परंतु मला परिस्थितीने करता आले नाही. डी. एड ला गेले तेथे ही मला माईसाहेबांनी मानसिक व आर्थिक आधार दिला. व मी कोर्स ६५% मिळून पूर्ण केला. या मुले माझी राजा झाली तरीही मला माईसाहेब ओरडल्या नाहीत. डी. एड नंतर त्या म्हणल्या तुला आता बालमंदिर मध्ये राहता येणार नाही. मी म्हणाले मला प्रराठीक ला शिकवायला जमणार नाही. त्यावर त्या म्हणाल्या मी आहे ना. संगतेतुला. प्रार्थमिक विभागाकडे माझी नियुक्ती झाली आणि मी खरोखरच त्यांचा प्रेरणेने व त्यांच्या शिकवण्यामुळे मी दुसरीचा वर्ग घेऊ लागले. माझे काम आवडल्याचे  माईसाहेबांनी सांगितल्यावर तर मी अधिक उत्साहाने व आनंदाने अधिकाधिक  चांगले शिकवण्याचा प्रयत्न करू लागले. १९६९ ते १९७७ पर्यंत लहानमुल व माईसाहेब यांच्या सहवासात गेलेले आनंदी दिवस पुन्हा कधी येणार नाहीत . माझ्या लग्नाच्या वेळी शाळेतून जे जे साहित्य लागेल ते घेऊन जा म्हणून सांगितले. सर्वतोपरी सहकार्य करून मला स्वावलंबी बनवले, सजत आज मुख्याध्यापिका म्हणून मांचे स्थान मिळूवून दिले याचे सर्व श्रेय मा.माईसाहेबांनआच द्यावे लागेल. माझ्या दोन्ही मुलांचे ई. १० पर्यंत शिक्षण विनामूल्य याच शाळेत झाले आहे व ती आता शिकून बाहेर पडली आहेत. माईसाहेबांनी केलेले उपकार कधीही फिटणार नाहीत. बाहेरचे कानीही मोठे पाहुणे शाळा पाह्यला आले व त्यांनी विचारले की हि एवडी मोठी जागा कोणाची ? तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु मला ही खूप आदर, कृतज्ञता वाटते की त्या मला हाक मारून सांगत होत्या "की हिच्या वडिलंची ही सर्व जागा " सांगण्यात किती उदारपणा होता, आहे. माझी ओळख करून देताना त्या म्हणत, " ही इथेच माझ्या हाताखाली तयार झाली, ब. ए. झाली , डी. ए ड झाली , इथेच बालमंदिर पासून आज   प्रार्थमिक विभागाची मुख्याध्यापिका झाली. हे सर्व त्यांच्या तोंडून ऐकताना मला आकाश ठेंगण वाटते...वाटते माझ्यासारखी नशीबवान मीच. आजही ' आमिना ' अशी गोड हाक ऐकावी वाटते. पण प्रार्थमिक विभाग थोडा लांब असल्याने त्यांचा सहवास थोडा कमी मिळतो.
अशा गुरुतुल्य पूजनीय माझ्या माईसाहेबांना उदंड आयुष्य लाभो. त्यांनी द्यानारूपी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे त्याचा आणखी उत्कर्ष होवो. त्यांच्या संथेचे नाव भारतात चंद्र सूर्याप्रमाणे चमकत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Author
सौ अमिरुंनिसा आ. इनामदार

[ Original Article from "सुवर्ण पंख" . Read Note for more information ]