About our School

Find out a little information about our school and its foundation.

The Students

Find out your Batch-mates, Alumni and add your information

The History

Know some known and unknown facts about our school.

Gallery

Pictures which will refresh your memories !

Contact us

Contact us and leave Feedback.

Saturday, April 21, 2012

आठवणींचा ओलावा [ भाग १ ]

जुलै महिन्याची सुरवात होती. अर्थातच पावसाला होता. मेघराज धो-धो पाऊस ओतत होता. अशाच वेळी मी प्रथम माईसाहेब यांना भेटायला गेले होते. अर्थातच नोकरीसंबंधी, नुकतीच डी.एड. होऊन बाहेर पडले होते. नोकरी करण्यासाठी केवळ डी.एड. झाले न्हवते तर शिक्षक म्हणून कसे शिकवावे याचे अभ्यासू ज्ञान व्हावे म्हणून. माझ्या डी.एड. च्या प्राचार्य सौ. मोहिनिताई जोशींनी मला एक दिवशी बोलावले आणि विचारले कि माईसाहेब सकाळची मोन्तेसरी सुरु करत आहेत आणि तुम्ही जाता का ? प्रथमताच मी कोणताही विचार न करता मी झटकन बाईना सांगितले कि मी शिवान डिप्लोमा करत आहे आणि मला कस जमणार. त्याक्षणी बाई काहीही बोलल्या नाहीत पण दुसर्या दिवशी त्यांनी मला परत बोलावून सांगितलं कि तुम्ही डिप्लोमा साठी थोड्या मागे पुढे वेळाने आलात तरी चालेल. त्यावेळी मी बाईना स्पष्ट शब्दात माझे मनातले विचार सांगितले कि माझे आणि माईसाहेब यांचे पटणार नाही. त्याच क्षणी बाईनी मला समजुती च्या स्वरात सांगितले ज्या दिवशी पटणार नाही त्या दिवशी पाहू. तुम्ही आधी जा तर. खरोखरच आता वाटत मा. मोहिनीताई यांनी माझ्यावर अनंत उपकार केले ते कधीही मी कोणत्याही प्रकारे फेडू शकणार नाही. या उपकारांची शिदोरी घेवून मी आज २० - २१ वर्षे माईसाहेब यांच्या संस्थेत नोकरी करत आहे. माझे आणि माईसाहेब यांचे पटणार नाही अशी दुराग्रही भूमिका घेवून घरी बसले असते तर अनेक चांगल्या गोष्टीना मी मुकले असते.
माईसाहेब यांनी ज्यावेळी सकाळचे बालमंदिर सुरु केले होते त्या सकाळच्या बालमंदिरामध्ये मी रुजू झाले. मी ज्या वेळी त्यांना भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी माझी मुलाखत अशी घेतलीच नाही आणि Certificate सुद्धा पहिले नाही. माईसाहेब आणि माझी कोणतीही पूर्वओळख न्हवती. त्यांना मी भेटले आणि सांगितले कि मी श्री. मोहिनिताई जोशीबाई यांचे कडून आली आहे. त्यांनी फक्त माझे नाव विचारले आणि उद्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत या असे सांगितले. बोलावाल्यानातर जायलाच हवे म्हणून तेथून पूर्ण बसची चौकशी केली. त्यावेळी ताराबाई पार्क म्हणजे अगदी निर्मनुष होते. वेळेवर बस न्हवत्या पण त्या सकाळच्या वेळी सुद्धा मी कधीही वेळाने गेले नाही. कारण माईसाहेब यांना हे आवडणार नाही हे मनावर ठसले होते. आणि त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होतीच.
माईसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी बाल्मान्दिराचा वर्ग घेवू लागली. त्यांची तशी जवळीक झाल्याने त्यांच्या आवडी - निवडी , त्यांच्यातील नीटनेटकेपणा, आणि सर्व मुलांना अहो - जाहो बोलण्याची सवय या सर्व गोष्टींची मला चांगलीच ओळख झाली. आणि त्यांच्यातील नीटनेटकेपणा आणि कष्ट करण्याच्या गुण त्यांच्या इतका नाही तरी थोडातरी माझ्याकडे यावा अस मला वाटत. माईसाहेब यांची टापटीप आणि कामसूपणा तर लक्षात आलाच. माईसाहेब त्यावेळी स्वतः सर्व कपाटे लावून घ्यायच्या आणि कोणती वस्तू कोठे ठेवली आहे हे बंगल्यात बसून सांगायच्या. खरोखर त्यांच्या स्मरणशक्तीचे कौतुक वाटते. हे परमेश्वराची देणगी आहे. , कि हा एक गुण आहे , कि अवगत कला आहे या गोष्टीचा उलगडा २० वर्षे झाली पण अजून झालेला नाही. 

Author
Vimal Makote


[ Original Article from "सुवर्ण पंख" . Read Note for more information ]

Sunday, April 8, 2012

A Letter

A letter from Pralhad. Keshav Atre [a.k.a. Keshavkumar or Acharya Atre] to Maisaheb

[Click on Image to enlarge]



Thursday, April 5, 2012

शिक्षण तपस्विनी

शिक्षणासारख्या ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रातही बेशिस्त व भ्रष्टाचार सर्वत्र फोफावत असतानाच अभिमानाने नामोल्लेख करावा अशा फारच थोड्या संस्था अस्तित्वात आहेत. इतर शैक्षणिक संस्थाना आदर्श व मार्गदर्शक ठरावी अशी कोल्हापूर जिल्यातील एक नमवत संस्था म्हणजे "श्रीपंत अमात्य बालविकास विश्वस्थ निधी"
आदर्श व संस्कारक्षम ज्ञानदानाने पवित्र कार्य गेली ५०  वर्षे सातत्याने करीत १९९७ मध्ये सुवर्माहोत्सव साजरा करणारी माईसाहेब बावडेकरांची हि संस्था.
बालकांच्या कोवळ्या मनावर योग्य वयामध्येच व वेळेवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना वळण लागावे व चांगले शिक्षणही मिळावे म्हणून विशिष्ठ ध्येयाने प्रेरित होऊनच मा. माईसाहेब यांनी १९४६ साली सुरु केलेली हि संस्था. ऋषी मुनी वर्षोनी वर्षे तपशर्या करीत स्वतःच्या अध्यात्मिक उन्नती साठी !समाजाच्या, भावी पिढीसाठी बालकांच्या उज्वल भवितव्यासाठी उभे आयुष्य चंदनाप्रमाणे झिजणाऱ्या - वेचणाऱ्या माईसाहेब यांना खरोखरच शिक्षण क्षेत्रातल्या थोर तपास्वीनीच म्हणावे लागेल. - "शिक्षण तपस्विनी" !
कलाध्यापक म्हणून गेली १० वर्षे या या शाळेत काम करीत असतानाच मा. माईसाहेब यांच्या कार्याचा अगदी जवळून परिचय झाला. मा. माईसाहेब यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्व व शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदाना बद्दल मनोदय प्रगत करण्याची हि संधी मिळणे म्हणजे खरोखर भाग्याची गोष्ट आहे. स्मरणिकेच्या निम्मिताने हि संधी मिळाली याचा आनंद वाटतो. त्याच बरोबर मनोगत व्यक्त करताना माईसाहेब यांच्याबद्दल आदरयुक्त भीती हि वाटते.
"बाल देवो भवं" हे ब्रीद वाक्य घेवून सुरु केलेली हि संस्था ! ब्रीद वाक्यावर असलेली गोलातील चित्र मोठे अर्थपूर्ण आहे. मातेचे बोट भक्कमपणे धरून दिमाखात चाललेले मुल! हा आधाराचा हात दुसऱ्या कोणाचा नसून प्रत्यक्ष माईसाहेब यांचा ! या हाताच्या साक्षीनेच मग बालमंदिरची सुरवात होते. आज या संस्थेचा वाढलेला व्याप पहिला या यशामागे आशीर्वादाचा, मायेचा हात खंबीरपणे उभा आहे. आणि 'बाल विकास विश्वस्थ निधी' या संस्थेच्या नावातच बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबंध व तत्परता असल्याचे सांगितले आहे.
हे शिक्षण संस्था म्हणजे माईसाहेब यांनी चालवलेले एक कुटुंबच म्हणावे लागेल. मोन्तेसोरी बालमंदिर, मोन्तेसोरी प्राथमिक विद्यालय व सौ. न. श. पंत वालावलकर प्रशाला या तीनीही शाखा अविभक्त कुटुंबाचा भागच असून त्यावर माईसाहेब यांचा प्रेमळ वरदहस्त, मार्गदर्शन व प्रसंगी प्रीतियुक्त दराराहि आहे. त्यामुळे अत्यंत कडक शिस्तीत संस्कारक्षम वातावरणात या संस्थेचे काम चालते. तसा या शाळेचा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लौकिक व आदर्श आहे. म्हणूनच पालक काहीही करून  आपल्या पाल्याला या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी अक्षरशः धडपडत असतात. या धडपडीत जे यशस्वी होतात ते स्वतःला भाग्यवान समजतात असे म्हंटले तर वावगे नाही. आणि प्रवेश मिळालेल्या बालकाचे तर भाग्याच उदयास येते.

Author
Ramesh V. Kulkarni

[ Original Article from "सुवर्ण पंख" . Read Note for more information ]

Tuesday, April 3, 2012

ते सुंदर दिन हरपले

मनामध्ये असू द्यावा 
आठवणींचा कप्पा ,
मग दूर गेलेल्यांशी 
मारता येतात गप्पा. 
Collected still of Playing Children From Balmandir

या ओळी खरोखर सार्थ आहेत. होऊन गेलेल्या अनेक गोष्टी मनःचक्षु समोर आणल्या जातात त्या आठवणीमुळेच ! शाळेच्या बारा वर्षाच्या कालखंडात अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या विसरणे शक्यच नाही. अशाच काही आठवणीना कागदावर उतरवण्याचा हा एक प्रयत्न !
शाळेचा पहिला दिवस कोण विसरू शकेल ? मला तो संपूर्ण दिवस आठवतो. बहुतेक सर्व शिक्षिका मला माहित असल्यामुळे मला कुणाची भीती वाटत न्हवती. त्यामुळे इतर मुलांप्रमाणे पहिल्या दिवशी शाळेत रडत न जाता उत्साहात मी शाळेला गेलो. दारातच बयोबाई व सुशीलाबाईंनी मला ओळखले आणि त्या मला बालमंदिरात घेवून गेल्या. आत आढाव आत्या , उर्मिलाबाई व शीतलताईना बघून मला खूप आनंद झाला. मग सर्वांशी गप्पा मारून घसरगुंडी खेळायला गेलो. त्यानंतर प्रथानेची वेळ ! सर्व अनोळखी मुले व मुली बाल्मान्दिराच्या हॉल मध्ये एकत्र जमली होती. त्यावेळी शुभ्र साडीतील, शुभ्र वर्णाच्या एक अनोळखी बाई हजार होत्या. त्यांना पाहून मनात एक अनामिक भीती तयार झाली. प्रथांना झाल्यावर आढाव आत्या मला त्यांच्याकडे घेवून गेल्या. त्या होत्या आपल्या सर्वांच्या प्रेमळ माईसाहेब !
बाल्मान्दिरामध्ये अनेक खेळ खेळलो, अभ्यास केला, विविध प्रकारची चित्रे शीलाताईनि काढायला शिकविली. आढाव आत्यानी गोष्टी सांगितल्या तर उर्मिला बाईबरोबर गाणी म्हंटली. पण त्यावेळी घसरगुंडी व झोपाळा हे विशेष प्रिय होते.
बालमंदिरनंतर प्राथमिक मध्ये खेळाबरोबर अभ्यासही सुरु झाला. इयत्ता तिसरी मध्ये असताना माईसाहेब आमच्या वर्गामध्ये येत असत. तसेच गणिते सोडवायला देत आणि तपासात. एकेदिवशी त्यांनी गणिते घातली व नेहमीप्रमाणे ती मी सोडवली. पण एक गणित चुकले. एक गुणिले एक बरोबर दोन असे मी लिहिले होते व नंतर दोन ऐवजी शून्य करून दाखवले. त्यावेळी त्या खूप रागावल्या आणि डबा खाऊ दिला नाही. वर्गातील सर्व मुले डबा खात होती व मी रडकुंडीला आलो. शेवटी सर्व मित्रांनी आणि मैत्रिणीनी मला गाणित बरोबर करून दिले. पण तेंव्हा पासून एक गुणिले एक बरोबर एक हे मी कधीच विसरलो नाही.
चौथीत असताना प्रथमच एक सर आम्हाला शिकवायला आले. त्यावेळी मी वर्ग सेक्रेटरी होतो व दाराकडे पाठ करून काहीतरी बोलत होतो. त्यावेळी त्यांनी मला पाठीवर मारले. त्यामुळे मी एकदम दचकलोच. हे म्हणजे आपले पाटील सर ! पुढे पाटील सर अगदी जवळचे वाटू लागले पण त्यांचा पहिला मार मी खाल्ला आहे.
प्राथमिक नंतर हायस्कूल मध्ये आल्यावर , स्पर्धात्मक युगाची जन येवू लागली. वक्तृत्व, निबंध, एकांकिका ( एक पात्री ) अशा अनेक स्पर्धात मी भाग घेवू लागलो. भूयेकर बाई मला विशेष मार्गदर्शन करायच्या. भूयेकर बाईनी लिहून दिलेल्या एका एक पात्री नाटकामुळे मला नंबर मिळाला होता. राजगुरू बाई मला वक्तृत्व स्पर्धेसाठी मार्गदर्शन करायच्या. एकदा मी आजारी असताना त्यांनी मला पिशवी भरून पुस्तके वाचायला दिली होती. तसेच सहावी नंतर २ इंग्रजी पुस्तके मला भेट दिली होती. ती अजूनही मी जपून ठेवली आहेत.
इंग्रजीच्या बाबतीत तसा आमचा वर्ग सुदैवी ठरला कारण प्रत्येक इयत्तेत एक नवीन इंग्रजीचे शिक्षक आम्हाला लाभले व त्यांच्या जवळचे ज्ञान आम्हाला मिळाले. इयत्ता सतावित असताना खेळात आमच्या वर्गाने विशेष नैपुण्य मिळवले व त्यावर्षी जनरल चाम्पियनशिप मिळवली होती.
इयत्ता आठवी, नववी, दहावी हि वर्षे अभ्यासातच निघून गेली. शिंदे सर, जाधव सर, शेलार सर यांनी नेहमीच चांगले मार्गदर्शन केले. वर्दे बाई नेहमी आमच्याशी चांगल्या वागल्या.
अशाप्रकारे शाळेतील प्रत्येक शिक्षक घरातील माणसाप्रमाणे वाटत असत. किंबहुना शाळा एक कुटुंबच वाटत असे. पण जगाच्या विशाल प्रांगणात एका नव्या उत्साहाने पाऊल ठेवण्यासाठी शाळेने तयार केलेला अत्म्विश्स्वास नेहमीच उपयोगी पडेल.
शाळेत आलेला प्रत्येक अनुभव नेहमी उपयोगी पडलेल्या अश्या या शाळेतील सर्व आठवणींनी मन आनंदित होते.
या शाळेचा मी सदैव ऋणी राहीन शाळेचा अनुभवलेला आनंद पुन्हा कधीच मिळणार नाही.
आह ! सुंदरते दिन हरपले
मधुभावांचे वेड जयांनी मनाला लावले
.

Author
Ganaraj Shree. Makote.

Monday, April 2, 2012

श्रीगणेशा

प्रथम पासूनच कोल्हापूरची ओढ होती. त्यामुळेच मी माझे कॉलेज शिक्षण कोल्हापुरात पूर्ण केले. कोल्हापूर नगरवासीयांच्या अतूट प्रेमामुळे सतत याच शहरात राहावे, नोकरी मिळावी हि माझी प्रथमपासूनच धडपड होती. अशावेळी एक अनोळखी व्यक्ती कडून मा. माईसाहेब यांच्या शाळेत आपल्याला नोकरी मिळू शकेल असे समझले. या परिसरातून वारंवार ये-जा करत होतो. परंतु शाळेमध्ये कधीही येण्याचा प्रसंग आला नव्हता. तसा मी या शाळेला नवखाच होतो.
प्रथमच शाळेत येताना माईसाहेब यांच्या समोर जावे लागले. त्यावेळी मनात भीती निर्माण झाली होती. प्रचंड नावलौकिक आणि कडक शिस्त असलेल्या या शाळेत आपल्याला नोकरी मिळेल का नाही? असे सतत वाटत होते. असे असताना माईसाहेब यांनी मला नोकरी दिली हि किती भाग्याची गोष्ट आहे.
प्रथम शाळेत काम करायला सुरवात केली होती. अजूनही विद्यार्थी दशा पूर्णतः संपलेली नव्हती. अशातच या वातावरणाशी समरस होताना संकटे येत होती. काही चुकाही होत होत्या. परंतु प्रत्येक वेळी माईसाहेब यांनी मुलाप्रमाणे मला आधार दिला. या शाळेतील माझ्या इतर सहकार्यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन अमूल्य आहे. या शाळेतील मुख्य घटक म्हणजे 'विद्यार्थी'. सुरवातीस मी नवीन असताना मुलांची ओळखही नव्हती. परंतु मुलांमध्ये शिक्षणाबद्दलचा असलेला आदर , शाळेची शिस्त, काही विशिष्ट नियम यामुळे या ठिकाणी काम करताना सार्थक वाटले.

Author
Jadhav D. J.
( 1997 )


[ Original Article from "सुवर्ण पंख" . Read Note for more information ]

रिक्षा मामा


ज्या वेळी आपण शाळेत होतो त्यावेळी आपला सगळ्यात आवडता आवाज म्हणजे ५ वाजताची घंटा. ती वाजली रे वाजली कि पूर्ण परिसराचे रूपाच बदलून जायचे. कंटाळा एकदम गायबच ! मग काही जन वर्गात दप्तर भरत , कोणी पाणी प्यायला जात, कोणाला सायकल काढायची घाई, तर कुणाला रिक्षात बसायची. या सगळ्यात रिक्षाचा होर्न आणि रिक्षा मामांची आरडा ओरड हि सुखावह वाटे. रिक्षा मामा आणि मुले यांचे वेगळेच नाते झालेले होते. अजूनही कधी ते मामा आपल्याला दिसले तरी आपण स्मित करून आपले जुने दिवस आठवतो. रोज न चुकता मुलांना घरून घेवून जाने आणि संध्याकाळी सुरक्षित पुन्हा आणून सोडणे हि महत्वाची कामगिरी हे मामा पार पडतात. अशांना विसरून कस चालेल. खाली रिक्षा मामांच्या नावाची यादी दिली आहे. पहा आठवतात का तुमचे मामा !!


  1. विलास माने
  2. सुरेश पाटील
  3. श्रीपती मोरे
  4. सुर्यकुमार कोतमिरे
  5. विजय धुमाळे
  6. आर. एल. शिंदे
  7. नंदकुमार खोत
  8. जगदीश पोवार
  9. मधुकर निर्मळे
  10. मोहन घेवारी
  11. सुधाकर चोडणकर
  12. अनिल शिंदे
  13. उमेश जाधव
  14. राजू एडगे
  15. राजन पोवार
  16. राजाराम कुंभार
  17. रमेश जाधव
  18. रमेश कुलकर्णी
  19. दिलीप आचार्य 

Author
Rohit Suratekar

Batch 1946

This was the first batch of our school.
We dont have information about all 10 students who were admitted to Balmandir in 1946.
But from various articles of Maisaheb, we have collected some names.

First Female Student who admitted to Balmandir was Niece of Maisaheb.

First Male Student admitted : Dilip Bhosale

Other known students
  1. Arun Oberoy
  2. Ashish




[ Click Here to add any more information to above list ]
[ Contact us for any further queries or recent updates. ]

Sunday, April 1, 2012

वालावलकर दांपत्य


मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आल्यानंतर स्वतःच्या घामाची भाकर मिळवायची या ध्यासाने मा. शा. कृ. पंत वालावलकर उर्फ बापू यांनी मुंबईची वाट धरली. मुंबईतील मेनन डक्ले या प्रख्यात बांधकामाचे ठेके घेणाऱ्या कंपनीत ३० रुपयांवर मुकादम म्हणून काम सुरु केले. पण लगेचच पावसाळा सुरु झाला. बांधकाम थांबले व बापूंची नोकरीही संपुष्टात आली. त्यानंतर व्यापार करावयाचा असा निर्णय घेतला. बापूंच्या खिशात फक्त १५ रुपयेच शिल्लक होते. त्यातूनच तराजू व वजने घेतली. भाजी विकायचा धंदा सुरु केला. प्रामाणिकपणा, कष्ट व चिकाटी हे संस्कार. व्यापार नसला तरी पोट भरायचे.
Valavalkar Couple.
वयाच्या २४ व्या वर्षी बापूंचा शुभविवाह सामंत - नेवाळकर परिवारातील नलिनीताईशी झाला. घरातील लोकांच्या आग्रहास्तव बापू लग्नानंतर परत आपल्या मायभूमीत आले. व्यापारात आत्मविश्वास दुणावला व ते कुडाळसारख्या छोट्या व्यापार पेठेतून कोल्हापूर सारख्या मोठ्या व्यापारपेठेत आले. कोल्हापूरमध्ये व्यापार करत असताना सौ. नलिनीताईपण त्यांच्या बरोबरीने राबल्या. प्रत्येक कर्तुत्ववान पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो ; हे वाक्य बापूंच्या बाबतीत खरे असल्याचे दिसून येते. कापस धंद्यात मंदीची लाट आली तरी या दापात्याने धैर्याने तोंड दिले.
बापू हे धर्मानुरागी होते. ताप करून जी गुरुकृपा मिळत नाही ती त्यांना लाभली. श्री. बलावाधुत बालमुकुंद महाराजांचा त्यांच्यावर अनुग्रह झाला. त्याक्षणीच बापूनी आपले सर्वस्व गुरुचरणी अर्पण केले. कोल्हापुरात व्यापार व उद्योगात घट्ट पाय रोवल्यानंतर बापूनी समाजसेवेचे व्रत स्वीकारले. बापूनी आपले सारे जीवन व वित्त समाजासाठी अर्पण केले. आज कोल्हापुरातील अनेक संस्थांचे ते संस्थापक, हितचिंतक आणि आश्रयदाते म्हणून कार्यरत आहेत.एवढेच न्हवे तर संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांनी शैक्षणिक, सामाजिक संस्था, विद्यालये, दवाखाने उभारले आहेत. या दाम्पत्यांनी व त्यांच्या ट्रस्टीनि आजवर शिक्षण , आरोग्य, धर्मसमाजसेवा इ. क्षेत्रातील कल्याणकारी कार्यासाठी सुमारे ४ कोटी रुपयांचे बृहतदान केले आहे. दातृत्वाचा हा ओघ आजपर्यंत अखंडपणे वाहतो आहे. त्यांच्या दातृत्वाला मानवतेची झालर आहे. देव दगडात नाही तर माणसात असतो या भावनेपोटी बापूनी शैक्षणिक संस्था आणि अनाथालय यांच्या कडेच आपला दातृत्वाचा ओघ वळवला आहे.
अशा या थोर दानशूर व शिक्षणप्रेमी दाम्पत्याचा आमच्या शिक्षण तपस्विनी मा. माईसाहेब यांनी स्थापन केलेल्या "श्रीपंत अमात्य बालविकास विश्वस्त निधी" या संस्थेच्या वाडीला व विकासाला आधार 'वड' लाभला आहे.



Author
Anita D. Vardhe 

[ Original Article from "सुवर्ण पंख" . Read Note for more information ]